दिलासादायक ! कॅनरा बॅंक करणार 9 हजार कोटींची भांडवल उभारणी

वृत्तसंस्था
Wednesday, 4 September 2019

कॅनरा बॅंक या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेचे संचालक मंडळ पुढील आठवड्यात 9,000 कोटी रुपयांच्या भांडवल उभारणीच्या प्रस्तावावर निर्णय घेणार आहे.

नवी दिल्ली : कॅनरा बॅंक या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेचे संचालक मंडळ पुढील आठवड्यात 9,000 कोटी रुपयांच्या भांडवल उभारणीच्या प्रस्तावावर निर्णय घेणार आहे.

दोन महिने अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचे

प्रेफरेन्शियल इक्विटी शेअरच्या माध्यमातून हे भांडवल उभारण्याचा बॅंकेचा प्रयत्न आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक 13 सप्टेंबर 2019ला आयोजित करण्यात आली असून त्यातील 9,000 कोटी रुपयांचे भांडवल प्रेफरेन्शियल इक्विटी शेअरच्या माध्यमातून उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे बॅंकेने सांगितले आहे.

सिंडिकेट बॅंकेच्या विलीनीकरणाचाही प्रस्ताव कॅनरा बॅंकेच्या संचालक मंडळासमोर असणार आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर ही घडोमोड घडून येते आहे.

चांदीची चमक वाढली; हा आहे आजचा भाव

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 30 ऑगस्टला कॅनरा बॅंक आणि सिंडिकेट बॅंक या बॅंकांच्या विलीनीकरणाच निर्णय जाहीर केला होता. प्रामुख्याने दक्षिण भारतात कार्यान्वित असणाऱ्या बॅंकांच्या विलीनीकरणातून 15.20 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय असलेली चौथ्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक बनवणार आहे. या दोन्ही बॅंकांच्या विलीनीकरणानंतर देशभरात त्यांच्या 10,342 शाखा असणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Canara Bank ends at 52-week low board to mull Rs 9,000 cr capital infusion next week