खूशखबर ! लॉकडाऊनमध्येही 'ही' कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देणार पगारवाढ

वृत्तसंस्था
Thursday, 16 April 2020

आघाडीची फ्रेंच आयटी कंपनी कॅपजेमिनीने भारतातील 70 टक्के कर्मचाऱ्यांना एक आकडी वेतनवाढ देण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : आघाडीची फ्रेंच आयटी कंपनी कॅपजेमिनीने भारतातील 70 टक्के कर्मचाऱ्यांना एक आकडी वेतनवाढ देण्याची घोषणा केली आहे. ही वेतनवाढ 1 एप्रिल 2020 पासून लागू होणार आहे.  कॅपजेमिनीचे भारतात 1.2 लाख कर्मचारी आहेत. त्यातील 84 हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. कॅपजेमिनीच्या भारतातील उर्वरित कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात वेतनवाढ दिली जाणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कॅपजेमिनीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होते आहे. कोविड-19 च्या संकटामुळे सर्वत्र आर्थिक संकट उभे राहिल्यामुळे कंपन्या कर्मचारी कपात किंवा वेतनकपात करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कॅपजेमिनी निर्णय कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा आहे. याशिवाय ज्या कर्मचाऱ्या कोविड-19 मुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका बसला आहे त्यांना कंपनीकडून कमाल 10 हजार रुपयांपर्यंत भत्तादेखील देण्यात येणार आहे. लॉकडाऊन सुरू होण्याच्याआधी मार्च महिन्यात कंपनीच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला होता.

Coronavirus : मेघालयात कोरोनाचा पहिला बळी; डॉक्टरचा मृत्यू

कॅपजेमिनीमध्ये सध्या जे कर्मचारी कोणत्याही प्रकल्पावर कार्यरत नाहीत त्यांनादेखील नोकरीवरून कमी केले जाणार नसून  नियमित वेतन देण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे पूर्ण वेतन दिले जाईल अशी माहिती कॅपजेमिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्डी यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Capgemini India increases salaries grants allowances