सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; पगारात होणार मोठी वाढ

सरकारने महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ केली आहे, त्यामुळे नोकरदारांचा पगारही वाढणार आहे.
Salary Hike
Salary HikeSakal

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही कार्यरत असाल किंवा निवृत्त, सरकारने आता महागाई भत्त्याबद्दलचा मोठा निर्णय़ घेतला आहे. यामुळे आता सव्वा कोटी नोकरदारांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारने ही योजना आखली आहे. (7th pay commission big salary hike by central government)

Salary Hike
GoFirst आणणार आयपीओ, जुलै-सप्टेंबरपर्यंत होऊ शकतो लाँच

केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (DA) ४ टक्क्याने वाढ केली आहे. त्यामुळे आता ३४ टक्क्यांऐवजी ३८ टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे. सरकार येत्या ऑगस्टपर्यंत याविषयीची मोठी घोषणा करणार आहे. केंद्र सरकारने अद्याप याबद्दलची अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी माध्यमांच्या सूत्रांच्या आधारे ही माहिती हाती येत आहे.

Salary Hike
Share Market: सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला, निफ्टी 16300वर सुरु; M&M, टायटनचे शेअर्स वधारले

जर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ झाली तर एकूण महागाई भत्ता ३८ टक्के होईल. त्यानंतर पगारातही २.६० लाखांची वाढ होऊ शकते. या निर्णयाचा लाभ साधारण ४७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

Salary Hike
Petrol-Diesel Price: खुशखबर! पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

वर्षभरात दोन वेळा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते. पहिली वाढ जानेवारी ते जूनपर्यंत आणि दुसरी जुलै ते डिसेंबरमध्ये होते. याचा निर्णय AICPI(All India Consumer Price Index) इंडेक्सच्या आकड्यांवरून ठरवलं जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com