
दररोज करा 70 रुपयांची बचत आणि मिळवा दमदार रिटर्न...
गुंतवणुकीच्या दृष्टीने पीपीएफ (PPF) अतिशय चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे. यासाठी तुम्ही लाँग टर्मसाठी पैसे गुंतवू शकता. दमदार रिटर्नसह यात टॅक्स बेनेफिटसुद्धा मिळते. पीपीएफचे (PPF) सगळ्यात चांगले वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कमीत कमी म्हणजे 500 रुपयांची गुंतवणूक करु शकता आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयेही गुंतवू शकता. जाणून घेऊयात पीपीएफमध्ये (PPF) कशी गुंतवणूक कराल.
हेही वाचा: रुपया कोमात, डॉलर जोमात; भारतीय चलनाची आत्तापर्यंतची सर्वांत मोठी घसरण
रिटर्न किती मिळेल ?
पीपीएफमध्ये (PPF) दर महिन्याला 500 रुपयांच्या गुंतवणुकीने सुरुवात करु शकता. 500 रुपयांचा विचार केल्यास पुढच्या 15 वर्षात तुम्ही 1.6 लाखांचा फंड तयार करु शकता. तर दर महिन्याला 2000 रुपयांची गुंतवणूक केल्यास जवळपास 6.43 लाखांचा फंड तयार होऊ शकतो. एका वर्षात तुम्हाला 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीची मर्यादा आहे.
हेही वाचा: 'प्रधानमंत्री आवास योजने'चा कालावधी आणखी दोन वर्षे वाढणार?
पीपीएफमध्ये (PPF) 15 वर्षांचा लॉक इन पिरियड आहे. यानंतरही तुम्ही गुंतवणूक सुरु ठेऊ शकता. पीपीएफमध्ये (PPF) तुम्ही 15 वर्षांनंतरही आणखी 5 वर्ष गुंतवणूक करु शकता. याचा अर्थ तुम्ही एकुण 20 वर्षांसाठी मॅचुरिटी अमाऊंट ठेऊ शकता. यादरम्यान गुंतवणुकही करता येते. फक्त मॅच्युरिटी कालावधी पुर्ण होण्याआधी 1 वर्ष वाढीव काळासाठी अर्ज करावा लागेल. 20 वर्ष पुर्ण झाल्यानंतरही तुम्ही आणखी 5 वर्षांसाठी कालावधी वाढवू शकता.
प्री विथड्रॉवल अर्थात मॅच्युरिटीच्या आधी पैसे काढण्यासाठी 5 वर्षांचा लॉक इन पिरियड ठेवण्यात आला आहे. म्हणजेच अकाऊंट सुरु केल्यानंतर 5 वर्षांपर्यंत यातून पैसे काढता येत नाहीत. 5 वर्षांनंतर फॉर्म 2 भरुन मॅच्युरिटी पिरियडच्या आधी पैसे काढता येतात.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Check How To Invest In Ppf
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..