esakal | Children Day : नोकरीला लागायच्या आधीच तुमचे मूल होईल करोडपती; हा आहे प्लॅन
sakal

बोलून बातमी शोधा

child

आपण आज तुमच्या लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीचे महत्त्व जाणून घेणार आहोत.

Children Day : नोकरीला लागायच्या आधीच तुमचे मूल होईल करोडपती; हा आहे प्लॅन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात 14 नोव्हेंबर रोजी बालदिवस साजरा केला जातो. या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असतो. जवाहरलाल नेहरु यांना लहान मुलांची विशेष आवड होती. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस बालदिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशीच दिवाळीचा सण आहे. लक्ष्मीची पूजा करुन लोक सुख-समृद्धीची आराधना करतात. या दुहेरी मुहुर्तावर आपण आज तुमच्या लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. गुंतवणुकीच्या अशा विविध मार्गांबद्दल आपण जाणून घेऊयात की ज्यामुळे तुमचे मूल हे नोकरीला लागायच्या आधीच करोडपती बनेल. 

हेही वाचा - देशात शुक्रवारी 44,879 नवे रुग्ण; 24 तासांत 547 कोरोना रुग्णांचा मृत्यू
म्यूच्यूअल फंड्सना गुंतवणुकीचा उत्तम मार्ग मानला जातो. याद्वारे आपण केवळ आपल्या नावावरच नव्हे तर आपल्या मुलांच्या नावावरही गुंतवणूक करु शकता. जर आई-वडीलांनी योग्यरितीने गुंतवणूक केली तर आपले मूल 18 वर्षांचे झाल्याबरोबरच ते करोडपती बनलेले असू शकते. चला तर मग याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. 


कशी कराल गुंतवणूक?
मुलाच्या फक्त नावावरुनच म्यूच्यूअल फंड्समध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. अशा गुंतवणुकीत पालकांचे नाव आवश्यक ठरते. मुलाच्या नावावर म्यूच्यूअल फंड्स घेण्यासाठी त्याचा जन्मदाखला असणे आवश्यक आहे. मुलाचा पासपोर्टदेखील ग्राह्य धरला जाऊ शकतो. यासोबतच त्याच्या पालकांचे कागदपत्रे देखील आवश्यक ठरतात. 

हेही वाचा - असीम धैर्य दाखवणाऱ्या जवानांसाठी एक दिवा लावा; दिवाळीच्या मोदींनी दिल्या सदिच्छा

सिस्टीमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन 
म्यूच्यूअल फंड्समध्ये गुंतवणूक हा सर्वांत लोकप्रिय मार्ग आहे. मुलांच्या नावावर गुंतवणूक करताना सिस्टीमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्समध्ये पैसे गुंतवणे सर्वाधिक फायदेशीर असू शकते. मात्र, मूल 18 वर्षांचे झाल्यावर यामध्ये गुंतवणूक करता येत नाही. मूल 18 वर्षांचे झाल्यावर एका प्रक्रियेनंतर ते सगळे पैसे मुलाच्या नावावर होतील. 

18 वर्षे वयातच करोडपती होऊ शकतं मूल
जर आपल्याला आपलं मूल 18 वर्षांचे झाल्यावरच करोडपती व्हावं असं वाटत असेल तर मूल जन्माला आल्यावरच त्याच्या नावावर 5000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणुकीत दरवर्षी 15 टक्क्यांची वाढ करत रहा. जर या गुंतवणुकीवर दरवर्षी सरासरी 12 टक्क्यांचा परतावा मिळाला तर 18 वर्षांमध्येच तुमचे मूल करोरडपती बनेल, यात शंका नाही. 

loading image
go to top