मुकेश अंबानींना मागे टाकून चीनचा उद्योगपती ठरला आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Mukesh Ambani.png
Mukesh Ambani.png

नवी दिल्ली- मुकेश अंबानी यांना मागे टाकून चीनचे उद्योगपती झोंग शानशान आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. झोंग शानशान हे 'वॉटर किंग' म्हणून ओळखले जातात. त्यांची यावर्षी नेटवर्थ 70.9 अब्ज डॉलरवरुन 77.8 अब्ज डॉलर झाली आहे. झोंग शानशान हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तर ठरले आहेतच त्याशिवाय त्यांनी चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती 'अलीबाबा'चे संस्थापक जॅक मा यांनाही मागे टाकले आहे. शानशान हे बाटलीबंद पाणी आणि कोरोनाची लस तयार करण्याच्या व्यवसायात सक्रिय आहेत. 

झोंग शानशान यांच्याबाबत माध्यमांत कमी चर्चा झाली आहे. पत्रकारिता, मशरुमची शेती आणि आरोग्य सेवासारख्या क्षेत्रात हात आजमावल्यानंतर ते आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी चिनी तंत्रज्ञांच्या एका समुहाशी हातमिळवणी केली असून यामध्ये मुकेश अंबानी आणि जॅम मा यांचाही समावेश आहे. 

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, यावर्षी झोंग यांची संपत्ती वाढून 77.8 बिलियन झाली आहे. यंदा त्यांची संपत्ती वेगाने वाढली. चीनच्या बाहेर त्यांना खूप कमी लोक ओळखतात. 66 वर्षीय झोंग यांना चीनमध्ये 'लोन वुल्फ' नावानेही ओळखले जाते. ते दोन कारणांमुळे यशस्वी झाले. एप्रिलमध्ये त्यांनी बिजिंग वेन्टाई बायोलॉजिकल फार्मसी इंटरप्रायजेस कंपनी विकसित केली. त्यानंतर त्यांनी बाटलीबंद पाणी तयार करणारी नोंगफू स्प्रिंग कंपनी उभारली. ही कंपनी हाँगकाँगमध्ये सर्वांत लोकप्रिय ठरली आहे. नोंगफूच्या शेअरमध्ये स्थापनेपासून 155 टक्के झेप घेतली आहे. वेन्टाईने 2000 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com