esakal | कुणाच्या भल्यासाठी योगींची महाराष्ट्रात एंट्री?
sakal

बोलून बातमी शोधा

yogi adityanath

महाराष्ट्रच्या दौऱ्यावर असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील उद्योगधंदे उत्तर प्रदेशकडे येतील असं वक्तव्य केलं होतं.

कुणाच्या भल्यासाठी योगींची महाराष्ट्रात एंट्री?

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई: उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य. मोठ्या लोकसंख्येमुळे उत्तर प्रदेशात बेरोजगारांचं प्रमाण मोठं. उत्तर भारतीय राज्यांचा विचार केला असता विषेशतः बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यातून कामासाठी महाराष्ट्रात येणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या ठिकाणी उत्तर भारतातील कामगारांचं प्रमाण जास्त आहे. हे सर्व कामगार महाराष्ट्रात चांगला पगार, उत्तम राहणीमान आणि सुरक्षितता असल्याने आकर्षित होतात.

महाराष्ट्र अव्वल-
महाराष्ट्रामध्ये विविध उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे. चांगली वाहतूक व्यवस्था, भारतातील वित्तीय संस्थांचं केंद्र असणारं मुंबई, विस्तीर्ण समुद्रकिनारा, आंतरराष्ट्रीय आयात-निर्यातीसाठी पोषक बंदरेही आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात गुंतवणूक करताना महाराष्ट्राकडे आकर्षित होतात. त्यामुळे महाराष्ट्र विविध उद्योगधंद्यांच्या निर्देशांकात अव्वल आहे.  

उत्तर प्रदेशने सुरुवातीला पायाभूत सविधा, प्रशासनाचा दर्जा, औद्योगिक धोरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि कायदा व्यवस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे. नंतर आपोआप उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढेल. सध्या महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांनी या मूद्द्यांवर लक्ष दिल्यामुळे आज ते देशातील प्रगत राज्ये ठरली आहेत. 

-अभय टिळक, अर्थतज्ज्ञ

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील उद्योगधंदे उत्तर प्रदेशकडे येतील असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर योगींवर मोठी टीका झाली होती. कारण उत्तर प्रदेशातील उद्योगासाठींची असुरक्षितता आणि गुन्हेगारी जगजाहीर आहे. उत्तर प्रदेश राज्यात असणाऱ्या अडचणींमुळे तिथले नागरिक महाराष्ट्रात कामासाठी येत असतात. 

Gold Silver Price: नोव्हेंबरमध्ये सोने 2500 रुपयांनी स्वस्त; माहिती करून घ्या आजचे दर

'उद्योगपतींनी उत्तर प्रदेशात गुंतवणूक कराल तर तुम्हाला तिथं सुरक्षा, आदर आणि उद्योगधंद्यांना अनुकूल वातावरण मिळेल', असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या 2 दिवस दौऱ्यावर होते. इथं ते बऱ्याच उद्योजकांना भेटले. त्यावेळेस त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याचे उद्योगपतींना आवाहन केलं आहे.

मूलभूत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही उत्तर प्रदेशने लक्षणीय प्रगती केली आहे, असंही योगी म्हणाले. उत्तर प्रदेशात जास्त लोकसंख्या असल्याने बेरोजगारीमुळे राज्यातील बरेच जण महाराष्ट्रात येत असतात. तरीही योगी पुढे बोलताना म्हणाले की, राज्याची लोकसंख्या ही एक मोठी साधनसंपत्ती आहे तसेच त्याचा उपयोग उत्तर प्रदेशातील उद्योगधंद्याना होणार आहे.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, निरंजन हिरानंदानी, एल अँड टीचे एस. एन. सुब्रह्मण्यन आणि भारत फोर्जचे बाबा कल्याणी यांच्यासह आघाडीच्या कॉर्पोरेट मान्यवरांशी संवाद साधला. पण आता या संवादाचा किती उत्तर प्रदेशच्या विकासावर किती परिणाम होईल हा संशोधनाचा मुद्दा असेल.

Signs of economic revival: क्रेडिट कार्डच्या मागणीत होतेय वाढ

बुधवारी योगी आदित्यनाथ यांनी BSE मध्ये सत्राच्या सुरुवातील घंटानादही केला होता. तसेच बुधवारी योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत मुंबई शेअर बाजारात ( BSE) लखनऊ महानगरपालिकेच्या बॉण्डची नोंदणीही झाली. यावेळेस, कोरोनाकाळात लखनऊ महापालिकाने आत्मनिर्भर भारतच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे, अशी मत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व्यक्त केलं होतं.

(edited by- pramod sarawale)

loading image