CNG Price Hike : CNG च्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या काय आहेत नवीन दर

तुमचा खिसा आणखी मोकळा होणार आहे.
CNG Price Hike
CNG Price Hikeesakal

जर तुम्ही CNG वाहन चालवत असाल तर आता तुम्हाला तुमचा खिसा आणखी मोकळा होणार आहे. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. IGL ने CNG च्या दरात प्रति किलो 95 पैसे वाढ करण्याची घोषणा केली आहे.

या घोषणेनंतर दिल्लीत सीएनजी भरण्यासाठी 79.56 रुपये प्रति किलो मोजावे लागतील. किंमत वाढीची ही घोषणा 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होईल.

याआधी 8 ऑक्टोबर 2022 रोजी दिल्लीत CNG (CNG Price in Delhi) च्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यावेळी सीएनजीच्या दरात किलोमागे तीन रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

हेही वाचा : द वॉल ढासळतेय का?

तेव्हापासून दिल्लीत सीएनजी 78.61 रुपये किलो दराने विकला जात होता. गुरुग्राममध्ये सीएनजी 86.94 रुपये प्रति किलो, गाझियाबाद आणि नोएडा-ग्रेटर नोएडामध्ये 81.17 रुपये आणि रेवाडीमध्ये 78.61 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. दिल्लीत सीएनजीच्या दरात सुमारे 1 रुपयांनी वाढ केल्यानंतर आता इतर शहरांमध्येही दर वाढणार असल्याचे मानले जात आहे.

CNG Price Hike
Layoffs : आता आणखी एक कंपनी देणार 4000 कर्मचाऱ्यांना नारळ; वाचा काय आहे कारण?

दिल्ली-NCR मधील CNG च्या किमती (CNG Today Price in Delhi NCR) 7 मार्च 2022 पासून 15 वेळा वाढल्या आहेत. तेव्हापासून सीएनजीच्या दरात किलोमागे 23.55 रुपयांची वाढ झाली आहे. एप्रिल 2021 मध्ये, CNG 36.16 रुपये प्रति किलो दराने विकला जात होता, जो आता 86 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे त्यात आणखी वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com