esakal | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार मालामाल; वाचा काय घडले दिवसभरात! 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus sensex rise hops for getting relief package

जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदीला प्राधान्य दिले.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार मालामाल; वाचा काय घडले दिवसभरात! 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई Coronavirus : कोरोनाचा प्रसार आणि परिणाम रोखण्यासाठी विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोदी सरकारकडून दुसरे आर्थिक पॅकेज जाहीर होण्याच्या अपेक्षेने गुरुवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदीला प्राधान्य दिले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स 1265 अंशांनी वधारून 31 हजार 159 
अंशांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीमध्ये 363 अंशांची वाढ झाली. तो 9 हजार 111 अंशावर स्थिरावला. परिणामी एका दिवसात गुंतवणूकदार 4 लाख कोटी रुपयांनी मालामाल झाले आहेत. 

आणखी वाचा - मुंबईत नवे 79 रुग्ण, 9 जणांचा मृत्यू 

मीडिया वृत्तानुसार, केंद्र सरकार लवकर दुसऱ्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता असून ते गेल्या महिन्यात दिलेल्या 1.75 लाख कोटी रुपयांइतकेच असण्याची शक्यता आहे. नवीन पॅकेजमध्ये लघु आणि मध्यम व्यवसायासाठी व्याजदर कमी करणे, अडचणीत असलेल्या बांधकाम क्षेत्राला चालना आणि सर्वजनिक क्षेत्रातील बँकांना आर्थिक मदत देण्यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. चालू आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी 13 टक्क्यांनी वधारले आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 3.63 आणि 3.15 टक्क्यांनी वधारले. क्षेत्रीय पातळीवर ऑटो, बँक, मेटल, फार्मा, इन्फ्रा आणि एनर्जी कंपन्यांचे निर्देशांक गुरुवारी तेजीत होते.

आणखी वाचा - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना कोणाचं आव्हान?

गुंतवणूकदार मालामाल
बाजारातील तेजीमुळे एका दिवसात गुंतवणूकदार 4 लाख कोटी रुपयांनी मालामाल झाले आहेत. मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजारभांडवल गुरुवारी (ता.9) रोजी 120.82 लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. ते बुधवारी 116.82 लाख कोटी रुपये होते. सेन्सेक्सच्या पातळीवर महिंद्रा अँड महिंद्रा आणि मारुती सुझुकी या ऑटो क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर सर्वाधिक अनुक्रमे 16.64 आणि 13.16 टक्क्यांनी वधारले होते. तर, टायटन, हिरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स, एचडीएफसीचे शेअरमध्ये 9 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसून आली. जास्त वधारले होते. सेंसेक्समधील नेस्ले, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा आणि हिंदुस्थान युनिलिव्हर वगळता सर्वच शेअर सकारात्मक व्यवहार बंद झाले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपया 6 पैशांनी वधारून 76.28 रुपये प्रति डॉलरवर स्थिरावला.

loading image