Credit Card मार्फत घेतलंय कर्ज? चिंता करु नका; तीन ट्रिक्स करा फॉलो

क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास ते फायदेशीर ठरते.
credit cards
credit cardsesakal
Summary

क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास ते फायदेशीर ठरते.

देशात दिवसेंदिवस क्रेडिट कार्डचा (Credit Card) ट्रेंड वाढत आहे. क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास ते फायदेशीर ठरते. मात्र, जर तुम्ही त्याचा हुशारीने वापर केला नाही तर क्रेडिट कार्ड तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात अडकवू शकते. जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर तुम्हाला मोठे शुल्क आणि दंड भरावा लागेल. जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या (Credit Card) कर्जामध्ये अडकले असाल, तर येथे 3 ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला क्रेडिट कार्ड कर्जाचा भार कमी करण्यास मदत करू शकतात.

credit cards
एकापेक्षा जास्त Credit Card वापरताय? या गोष्टींकडे लक्ष द्या

तुमचे Transaction EMI मध्ये रूपांतरित करा:

अनेक वेळा तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर तुम्हाला मोठा दंड आणि व्याज भरावे लागते. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला EMI चा पर्याय देतात, ज्याद्वारे तुम्ही तुमचा व्यवहार (Transaction) EMI मध्ये बदलू शकता. यामुळे तुमच्यावरील कर्जाचा बोजा कमी होऊ शकतो.

थकबाकीची रक्कम दुसऱ्या बँकेच्या क्रेडिट कार्डवर ट्रान्सफर करा:

बॅलन्स ट्रान्सफर (Transfer) सुविधेमुळे तुमची सध्याची क्रेडिट कार्डची थकबाकी इतर कोणत्याही क्रेडिट कार्डवर ट्रान्सफर करता येते. तुमच्या सध्याच्या क्रेडिट कार्डवर जास्त कर्ज असल्यास आणि तुम्ही या क्रेडिट कार्डवरील थकबाकीची रक्कम इतर कोणत्याही बँकेच्या क्रेडिट कार्डमध्ये ट्रान्सफर करू शकता. शिल्लक ट्रान्सफर करण्यापूर्वी, नवीन क्रेडिट कार्ड कंपनी किंवा बँकेचे शुल्क माहित असणे आवश्यक आहे.

credit cards
Credit Card सांभाळून करा क्रेडिट कार्डचा वापर, नाहीतर होतील वांदे

वैयक्तिक कर्ज (Personal loan) हा एक पर्याय असू शकतो:

तुमच्या सध्याच्या क्रेडिट कार्डवर जास्त कर्ज असल्यास आणि EMI आणि बॅलन्स ट्रान्सफर करण्याव्यतिरिक्त, तुमच्यासाठी वैयक्तिक कर्ज (Personal loan) हा एक पर्याय असू शकतो. वैयक्तिक कर्जाचे व्याजदर सामान्यतः तुमच्या क्रेडिट कार्ड कर्जापेक्षा खूपच कमी असतात. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्डचे मोठे कर्ज आहे त्यांच्यासाठी हा पर्याय विशेषतः उपयुक्त ठरू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com