Panchang 20th sept: मंगळवारी लाल वस्त्र परिधान करा; शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४० ते दु.०३:१७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Daily Panchang
Daily Panchang google

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग २० सप्टेंबर २०२२

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २० सप्टेंबर २०२२ (Daily Panchang 20 sept 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २९ शके १९४४

आज सूर्योदय ०६:२६ वाजता तर सूर्यास्त १८:२९ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळी ही २६:१३ वाजता आहे. आज प्रात: संध्या स.०५:१५ ते स.०६:२६ दरम्यान होणार तर सायं संध्या ही १८:२९ ते १९:४१ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:४० ते १६:०५ दरम्यान होणार तर प्रदोषकाळ हा १८:२९ ते २०:५२ दरम्यान होणार. आज निशीथ काळ हा २४:०५ ते २४:५३ दरम्यान होणार तर राहु काळ हा १५:२९ ते १६:५९ दरम्यान होणार. आज यमघंट काळ हा ०९:२७ ते १०:५८ वाजता होणार.

आज श्राद्धतिथी ही दशमी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४० ते दु.०३:१७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी पडवळ खावू नये. या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

Daily Panchang
Panchang 14th sept: या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त - १०:५८ ते १२:२८

  • अमृत मुहूर्त - १२:२८ ते १३:५८

  • विजय मुहूर्त - १४:२९ ते १५:१८

पृथ्वीवर अग्निवास नाही. राहु मुखात आहुती आहे. शिववास २०:२५ नं.कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी २०:२५ नं.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - भाद्रपद

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - दशमी(२०:२५ प.नं. एकादशी)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - पुनर्वसु(२१:२५ प.नं.पुष्य)

  • योग - वरियान(०९:५८ प.नं.परिघ)

  • करण - वणिज(०७:२३ प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - मिथुन (१४:४६ नं.कर्क)

  • सूर्य रास - कन्या

  • गुरु रास - मीन

Daily Panchang
panchang: आजच्या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

विशेष:- भद्रा ०७:२३ ते २०:२५, दशमी श्राद्ध, नारायण दशमी व्रत

या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे. गणेश सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. गणेशास गुळाचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गुळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दु.०२:४६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com