esakal | सोन्याच्या भावात घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

Gold

जागतिक पातळीवरील घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सोन्यावर झाला आहे. सोमवारी उच्चांकी पातळी  गाठणाऱ्या सोने भावात मंगळवारी (ता.19) मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव दहा ग्रॅमला 46 हजार 660 रुपये झाला, त्यात 750 रुपयांची घसरण झाली. तर सराफा बाजारात सोन्याचा भाव 46 हजार 966 रुपयांवर पोचला आहे. चांदीचा भाव प्रति किलो 47 हजार 10 रुपये झाला आहे.

सोन्याच्या भावात घसरण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

* कमॉडिटी बाजारात मौल्यवान धातूंमध्ये तेजी
* सोने 50 हजारांवर जाण्याची शक्यता
* नजीकच्या काळात व्यापार युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता

मुंबई - जागतिक पातळीवरील घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सोन्यावर झाला आहे. सोमवारी उच्चांकी पातळी  गाठणाऱ्या सोने भावात मंगळवारी (ता.19) मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव दहा ग्रॅमला 46 हजार 660 रुपये झाला, त्यात 750 रुपयांची घसरण झाली. तर सराफा बाजारात सोन्याचा भाव 46 हजार 966 रुपयांवर पोचला आहे. चांदीचा भाव प्रति किलो 47 हजार 10 रुपये झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असल्याने गुंतवणूकदारांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. प्रचंड अनिश्चिततेच्या वातावरणामुळे सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार सुरू आहे.

लॉकडाऊन काळात वेतन देणे, आता कंपन्यांवर नाही बंधनकारक 

कमॉडिटी बाजारात मौल्यवान धातूंमध्ये तेजी
सोमवारी सोन्याचा भाव साडेसात वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोचले होते. मात्र सध्या सोन्याचा दर प्रतिऔंस 1731.50 डॉलर इतका आहे. अमेरिका-चीनमध्ये व्यापारी संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. नजीकच्या काळात व्यापार युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परिणामी कमॉडिटी बाजारात मौल्यवान धातूंमध्ये तेजी आहे. 

लॉकडाऊनमुळे महसूल घटल्यामुळे स्टार्टअप 'व्हेंटिलेटर'वर

सोने 50 हजारांवर जाण्याची शक्यता
सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्याकडे मोर्चा वळविला आहे. वर्ष 2008 मध्ये देखील आलेल्या जागतिक मंदीच्या लाटेत सोन्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला होता. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. परिणामी नजीकच्या काळात सोने 50 हजार रुपयांचा भाव  गाठण्याची शक्यता आहे.