HUL विरोधातील आंदोलन मागे! पण Colgateवर बहिष्कार सुरुच

मंगळवारी कंपनीच्या प्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर असोसिएशनने ही घोषणा केली.
Colgate
Colgateesakal
Summary

मंगळवारी कंपनीच्या प्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर असोसिएशनने ही घोषणा केली.

अखिल भारतीय ग्राहक उत्पादने वितरक महासंघाने (AICPDF) हिंदुस्थान युनिलिव्हर उत्पादनांवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. मंगळवारी कंपनीच्या प्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर असोसिएशनने ही घोषणा केली. बैठकीदरम्यान, वितरकांनी त्यांच्या उडान, जंबोटेल, वॉलमार्ट बेस्ट प्राइस, मेट्रो कॅश अँड कॅरी सारख्या B2B (बिझनेस टू बिझनेस) प्लॅटफॉर्म आणि कॅश-अँड-कॅरी कंपन्यांमधील मार्जिन असमानतेचा मुद्दा उपस्थित केला.

"हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL) ने आश्वासन दिले आहे की, ते त्यांच्या वितरकांच्या हितसंबंधांचे रक्षण करेल आणि किंमतीतील तफावत आणि इतर चुकीच्या गोष्टी सत्य असल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, म्हणूनच HUL विरुद्धचा बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला, ऑल इंडिया कंझ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनने (AICPDF) म्हटले. पण पुढील तीन महिने बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणार असल्याचे म्हटले. "जर कंपनीने तीन महिन्यांनंतर आपल्या चुकीच्या सवयी सुधारल्या नाही, तर ही मोहीम पुन्हा सुरू करू, असेही म्हटले. कंपनीने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास कोलगेट-पामोलिव्हच्या (Colgate-Palmolive) इतर ब्रँडवरही बहिष्कार टाकतील, असा इशारा AICPDF ने दिला आहे.

Colgate
भारतीय उत्पादने जगात पोहोचावीत

वितरकांचे म्हणणे आहे की अंबानींच्या सवलतींमुळे अधिकाधिक स्टोअर्सना त्यांच्या JioMart अॅपवरून डिजिटल ऑर्डर करण्यास प्रवृत्त केले जात आहे, ज्यामुळे 450,000 पेक्षा जास्त विक्री प्रतिनिधींना धोका निर्माण झाला आहे, जे अनेक दशकांपासून ऑर्डर घेण्यासाठी स्टोअर-टू-स्टोअर गेले आहेत.

"आम्ही एफएमसीजी क्षेत्रातील सर्व मोठ्या कंपन्यांना पत्र लिहिले होते आणि त्यापैकी बहुतेकांनी आम्हाला समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे, पण कोलगेट-पामोलिव्ह आपल्याच म्हणण्यावर अडून बसल्याचे, असोसिएशनने म्हटले आहे. त्यामुळेच, महाराष्ट्राच्या बाजारपेठेत कोलगेटच्या मॅक्स फ्रेश ब्रँडवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात करू आणि जर कंपनीने आमच्या तक्रारींची दखल घेतली नाही, तर आम्ही पुढील आठवड्यापासून कोलगेट वेदशक्ती ब्रँडचा स्टॉकसुध्दा बंद करू अशी चेतावणी AICPDF ने दिली.

Colgate
नायलॉन उत्पादने बनवणाऱ्या 'या' कंपनीबाबत शेअर बाजार तज्ज्ञांना विश्वास!

JioMart अॅपवरील कोलगेट मॅक्सफ्रेश टूथपेस्टचा दोन-ट्यूब पॅक सुमारे 115 रुपयांमध्ये खरेदी करता येतो, तर कोलगेट विक्री एजंटला ते 154 रुपयांमध्ये ऑफर केली जाते. ही किती मोठी तफावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

याव्यतिरिक्त, कंपनी वितरकांशी त्यांच्या व्यावसायिक आव्हानांचे निराकरण करण्यासाठी नियमितपणे बैठका घेते असेही म्हटले. या बैठकांमध्ये, गुंतवणुकीवर वाजवी परतावा देण्याव्यतिरिक्त इतर मुद्द्यांवर चर्चा केली जाते," असे कंपनीने म्हटले आहे. दुसरीकडे, एआयसीपीडीएफशी चर्चा करत नसल्याचे कोलगेट-पामोलिव्हने (Colgate-Palmolive) म्हटले आहे.

दुसरीकडे कोलगेट-पामोलिव्ह (Colgate-Palmolive) या विषयावर थेट वितरकांशी चर्चा करत असल्याचे त्यांनी मंगळवारी म्हटले आहे. महाराष्ट्रात काही कोलगेट-पामोलिव्ह उत्पादनांची विक्री बंद होण्याची शक्यता असल्याच्या वृत्तावर स्टॉक एक्स्चेंजने (Stock exchange)
कंपनीकडून स्पष्टीकरण मागवले होते. यावर गेल्या आठ दशकांमध्ये कंपनीचे वितरक (Distributor) आणि सप्लाय चेन पार्टनर्स सोबत मजबूत संबंध असल्याचे कंपनीने आपल्या उत्तरादाखल म्हटले आहे.

Colgate
कोरोना काळातील अस्पर्श उत्पादने

नेमका वाद आहे तरी काय ?

FMCG कंपन्या पारंपारिक वितरकांना (traditional distributors) 3.5-5 टक्के मार्जिन ऑफर करतात, पण नवीन प्लॅटफॉर्मवर अर्थात जिओमार्टसारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिल्यास 12-15 टक्के मार्जिनवर देतात. यामुळे सगळा गोंधळ निर्माण झाल्याचे एआयसीपीडीएफचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांचे सांगितले.

या बदल्यात, हेच नवे प्लॅटफॉर्म किरकोळ विक्रेते आणि किराणा स्टोअर्ससह सामान्य व्यापारी (GT) स्टोअर्सना सूट देतात, त्यामुळेच ते त्यांच्या नियमित वितरकांऐवजी (distributors) या नव्या प्लॅटफॉर्म्सकडून उत्पादने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. सामान्य व्यापार (General trade), देशातील आघाडीच्या FMCG कंपन्यांसाठी सर्वात मोठे चॅनेल आहे. जिथे कंपनी त्यांना उत्पादने पुरवतात, मग ते ही उत्पादने किरकोळ विक्रेत्यांना किंवा सामान्य ट्रेड स्टोअरला विकतात.

आघाडीच्या FMCG कंपन्यांच्या विक्रीत GTचा वाटा सुमारे 80-90 टक्के आहे; त्यानंतर किरकोळ व्यापार आणि ई-कॉमर्स यांचा नंबर लागतो. नवीन प्लॅटफॉर्म अनेक वर्षांपासून चाललेल्या या प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सामान्य ट्रेड स्टोअरसाठी उत्पादने खरेदी करण्यासाठी एक संघटित, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि किफायतशीर (cost-efficient) सिस्टिम देण्याचे वचन देत आहेत.

Colgate
परदेशातून आयात होणाऱ्या उत्पादनांना पर्यायी उत्पादने होताहेत तयार

अनेक वितरकांचे म्हणणे आहे की नवीन प्लॅटफॉर्म कंपन्यांचे विक्री प्रतिनिधी (B2B प्लॅटफॉर्म) सामान्य ट्रेड स्टोअरशी संपर्क साधून त्यांना सूट देत असल्याचे आढळले आहे.

भांडणाच्या केंद्रस्थानी HUL

डिसेंबरच्या अखेरीस, बहुतेक कंपन्या त्यांचे वितरक आणि AICPDF यांच्याशी चर्चा करत होत्या आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या. पण एचयूएल आणि कोलगेट-पामोलिव्हने त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नव्हते. त्यामुळेच वितरकांनी त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तो सुद्धा मागे घेण्यात आला आहे.

दूसरीकडे शेअर बाजारातही कोलगेटच्या शेअर्सवर परिणाम होऊ शकतो असा अंदाज मार्केट एक्सपर्ट व्यक्त करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com