Diwali 2022 : दिवाळीच्या मुहूर्तावर पुणेकरांची विक्रमी सोनं खरेदी; आकडा ऐकून व्हाल आवाक् | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold prices will be increase in Diwali goes upto 40 thousand

Diwali 2022 : दिवाळीच्या मुहूर्तावर पुणेकरांची विक्रमी सोनं खरेदी; आकडा ऐकून व्हाल आवाक्

पुणे : दिवाळीच्या सणामुळं सराफ व्यापाऱ्यांची चांदी झाली आहे. कारण यंदा दिवाळीच्या मुहुर्तावर पुणेकरांनी तब्बल १०० कोटी रुपयाचं सोनं खरेदी केलं आहे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी ही माहिती दिली. (Diwali 2022 Record buying of gold of 100 crore rupees by Pune People)

हेही वाचा: Viral Video : फुटपाथवर दिव्याच्या प्रकाशात अभ्यास; विद्यार्थिनीचे कष्ट पाहून नेटकरी भावूक

दिवाळीच्या सणामध्ये पाडव्याच्या दिवशी सोन-चांदी खरेदीची परंपरा आहे. त्यामुळं दिवाळीचा काळ हा सराफ व्यापाऱ्यांसाठी वर्षातला सर्वात मोठा सिझन असतो. बाजारात क्रयशक्ती कायम रहावी यासाठी सोन्याचे दरतही चांगलीच कपात झाली होती. 53 हजारावर गेलेलं सोनं 49 हजारापर्यंत खाली आल्यामुळं साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्यानिमित्त पुणेकरांनी सोन्याला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली.

हेही वाचा: Tata Airbus: एअरफोर्ससाठी आता टाटा बनवणार विमान; PM मोदींच्या हस्ते होणार उद्धाटन

यंदा एकूणच पाऊसमान चांगलं राहिल्यानं आणि त्यामुळं बाजारात तेजी होती. त्याचाच परिणाम सोन खरेदीवरही पहायला मिळाला. त्यामुळं यंदाच्या दिवाळीत शहरात अंदाजे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त सोन्याची खरेदी झाली. यंदाची दिवाळी ही सोनं-चांदी व्यापाऱ्यांसाठी गोड झाल्याचं फत्तेचंद रांका यांनी सांगितलं.

हेही वाचा: Bacchu Kadu: "दुश्मन का दुश्मन दोस्त होता है"; खोके प्रकरणी अनिल परब यांच्या बच्चू कडूंना शुभेच्छा

पुणे शहरात सोन्याची एकूण बाराशे दुकाने असून यावर्षी सगळ्याच दुकानात मोठी गर्दी दिसून आली याद्वारे पुणेकरांनी सोने खरेदीचा मुहूर्त साधला असल्याचं देखील रांका यांनी सांगितलं.