HCI Tech कडून गुंतवणुकदारांना दिवाळी भेट, प्रति शेअर 10 रुपयांचा अंतरिम डिव्हिडेंड

चसीएल टेक्नॉलॉजीज 2 नोव्हेंबरपर्यंत हा डिव्हिडेंड गुंतवणुकदारांना देईल.
HCL Tech
HCL Techsakal

एचसीएल टेकने (HCL Technologies) त्यांच्या गुंतवणुकदारांना दिवाळी भेट दिली आहे. कंपनीने बुधवारी तिसरा अंतरिम डिव्हिडेंड (Interim Dividend) जाहीर केला. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी हा डिव्हिडेंड आहे. याअंतर्गत गुंतवणुकदारांना प्रति शेअर 10 रुपये अंतरिम डिव्हिडेंड मिळेल.

कंपनीने अंतरिम डिव्हिडेंडसाठी 20 ऑक्टोबर ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीज 2 नोव्हेंबरपर्यंत हा डिव्हिडेंड गुंतवणुकदारांना देईल. प्रत्येक 2 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरसाठी 10 रुपये अंतरिम डिव्हिडेंड देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले आहे.

HCL Tech
Stock: 'या' सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना बनविले कोट्यधीश, 1 लाखाचे केले 2.77 कोटी

रेकॉर्ड तारखेनुसार एचसीएल टेकमध्ये शेअर्स असणारे गुंतवणूकदार या डिव्हिडेंडचे हक्कदार असतील. गुंतवणुकदारांना डिव्हिडेंड देण्याबाबत एचसीएलचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. सध्या, एचसीएल टेकचे डिव्हिडेंड यील्ड 4.4 टक्के आहे. कंपनीने या आर्थिक वर्षासाठी दोन अंतरिम डिव्हिडेंड आधीच दिला आहे. पहिल्यांदा त्यांनी एप्रिलमध्ये 18 रुपये प्रति शेअर अंतरिम डिव्हिडेंड जाहीर केला होता. दुसऱ्यांदा त्यांनी 10 रुपये अंतरिम डिव्हिडेंड जाहीर केला होता.

या आर्थिक वर्षात एचसीएल टेकने एकूण 28 रुपये डिव्हिडेंड जाहीर केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 2100 टक्के डिव्हिडेंड दिला होता. म्हणजेच 42 रुपये प्रति शेअर डिव्हिडेंडच्या बरोबर होते. एचसीएल टेक्नोलॉजीज (HCL Technologies) ही देशातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे.

बुधवारी एचसीएल टेक्नोलॉजीजच्या शेअर्समध्ये चांगली वाढ होऊन 953 रुपयांवर बंद झाली. या वर्षी आतापर्यंत स्टॉक 28 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

HCL Tech
HCL GAT Recruitment 2022: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये रिक्त जागांसाठी भरती; वाचा सविस्तर

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com