योगी राज 2.0 : 500 एन्काउंटर, 192 कोटींची मालमत्ता जप्त; जाणून घ्या 100 दिवसांचा कार्यकाळ

Yogi Adityanath Government
Yogi Adityanath Government esakal
Summary

योगी सरकार दुसऱ्या टर्मचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत आहे.

Yogi Adityanath Government : मार्च 2017 मध्ये प्रथमच उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ यांचं सरकार (Yogi Adityanath Government) आलं. 2017 ते 2022 या पाच वर्षांच्या कार्यकाळात सरकारनं कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारल्याचा दावा केलाय.

यंदाच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सरकारनं हे यश जनतेसमोर ठेवलंय. मार्च 2022 मध्ये योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा यूपीचे मुख्यमंत्री झाले. आता सरकारलाही दुसऱ्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण होणार आहेत. या 100 दिवसांतील कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हेगारी नियंत्रणाच्या प्रयत्नांवर एक नजर टाकूया...

100 दिवसांतील पोलिस चकमकींची आकडेवारी (25 मार्च 2022 ते 1 जुलै 2022)

  • - एकूण चकमकी 525

  • - अटक गुन्हेगार 1034

  • - पोलीस चकमकीत 425 गुन्हेगार जखमी

  • - पोलिसांच्या चकमकीत 5 बदमाशांचा खात्मा

  • - बदमाशांशी झालेल्या चकमकीत 68 पोलिसही जखमी झाले.

झोननिहाय चकमकीची आकडेवारी

  • - मेरठ झोन 193

  • - बरेली झोन ​​62

  • - आग्रा झोन 55

  • - लखनौ झोन 48

  • - लखनौ झोन 6

  • - वाराणसी झोन ​​36

  • - गोरखपूर झोन 37

  • - नोएडा आयुक्तालय 44

हल्लेखोरांसोबत झालेल्या चकमकीत पोलीस कर्मचारी जखमी

  • - मेरठ झोन 27

  • - बरेली झोन ​​16

  • - गोरखपूर झोन 10

  • - लखनौ झोन 9

  • - कानपूर झोन 2

  • - वाराणसी झोन 3

  • - लखनौ झोन 1

दुसऱ्या टर्ममध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी माफियांची ओळख पटवण्याचं प्रमाणही वाढवलंय. राज्य स्तरावर ओळखल्या गेलेल्या 50 माफियांसह डीजीपी मुख्यालयानं 12 माफियांचीही ओळख पटवली आणि त्यांच्यावर कारवाई केली. 25 मार्च 2022 ते जून 2022 पर्यंत एकूण 192 कोटी 40 लाख 34 हजार 582 रुपयांचा गँगस्टर कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलाय.

Yogi Adityanath Government
BSF जवानाच्या गोळीबारात 4 जवान शहीद; कोर्टाकडून अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश
  • सहारनपूरचे खाण माफिया आणि बसपा सरकारमधील माजी आमदार हाजी इक्बाल यांची १२७ कोटी ९३ लाख ४ हजार १८० रुपयांची मालमत्ता जप्त

  • संजीव माहेश्वरी यांची 4 कोटींची मालमत्ता जप्त

  • आंबेडकरनगरमध्ये गँगस्टर खान मुबारकची 1 कोटी 93 लाखांची मालमत्ता जप्त

  • प्रयागराजमध्ये अतीक अहमद यांची ५ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीय.

  • मुख्तार अन्सारीची गाझीपूर आणि मऊमध्ये 14 कोटी 31 लाखांची मालमत्ता जप्त

  • भदोहीमध्ये विजय मिश्रा यांची 4 कोटी 11 लाख 38 हजार 780 रुपयांची मालमत्ता जप्त

  • ध्रुव सिंह उर्फ ​​कुंटू सिंग यांची आझमगडमध्ये 4 कोटी 80 लाख 9 हजार रुपयांची मालमत्ता जप्त

  • बलरामपूरमध्ये माजी खासदार रिजवान झहीर यांची 14 कोटी 30 लाखांची मालमत्ता जप्त

राज्यस्तरावरील 50 माफियांशिवाय मुख्यालय स्तरावरही 12 गुंडांची 92 कोटी 18 लाख 96 हजार 700 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. अशाप्रकारे राज्यात आतापर्यंत 62 माफियांची 284 कोटी 59 लाख 31 हजार 282 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलीय.

Yogi Adityanath Government
प्रेयसीसोबत लॉजवर असताना तरूणाचा मृत्यू, खिशात सापडलं स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचं पाकीट

डीजीपी मुख्यालयातून प्रसिद्ध झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार...

  • - गुंड आणि माफिया 2,433 जणांची ओळख पटवली

  • - 17,169 जणांवर गुन्हे दाखल

  • - 1,645 जणांना अटक

  • - 134 न्यायालयात शरणागती

  • - 15 जणांवर कारवाई

  • - 36 जणांविरुध्द एनएसए

  • -788 विरुद्ध गुंड कायदा

  • - 618 जणांविरुध्द गुंडा कायदा लागू

  • - 47 जणांचे परवाने रद्द

  • - 719 व्यावसायिकांविरुध्द गुन्हा

  • - 619 माफिया तुरुंगात

  • - 1744 जणांची जामिनावर सुटका

  • - 18 माफिया मारले गेले

  • - ओळखल्या पटलेल्या 52 माफियांचा शोध सुरू

दुसऱ्या टर्मच्या सरकारमध्ये राज्याच्या मुख्यालयातून 62 गुन्हेगारी माफिया व्यतिरिक्त इतर भागातील माफियांचीही ओळख पटलीय. यामध्ये 30 खाण माफिया, 228 दारू तस्कर माफिया, 168 गुरे तस्कर माफिया, 347 भूमाफिया, 18 शिक्षण माफिया आणि 359 इतर माफिया यांचा समावेश आहे.

Yogi Adityanath Government
Petrol-Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दिलासा; देशात आजचे दर काय?

योगी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात अनेक घटना घडल्या

  • -ललितपूरच्या पाली पोलिस ठाण्यात पीडितेवर सामूहिक बलात्कार

  • -चंदौली इथं छापेमारी दरम्यान पोलिसांच्या निर्दयीपणामुळं मुलीला बेदम मारहाण करण्यात आली.

  • - प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या

  • - कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचारात दगडफेक आणि तोडफोड

  • -3 जूननंतर प्रयागराज, सहारनपूर, आंबेडकर नगर, मुरादाबादसह अनेक शहरांमध्ये हिंसाचार झाला.

  • -अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ बिहारला लागून असलेल्या बलिया, जौनपूर चंदौलीसह अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली.

मात्र, पोलिसांनी प्रत्येक गोंधळावर वेळीच कारवाई करत बंडखोरांना अटक करून तुरुंगात पाठवलं. शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचारात 10 जिल्ह्यांमध्ये एकूण 20 एफआयआर नोंदवण्यात आले असून आतापर्यंत 424 जणांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलंय. अग्निपथ योजनेच्या विरोधात 31 जिल्ह्यांमध्ये एकूण 82 एफआयआर नोंदवण्यात आले असून त्यात 1562 वर कारवाई करण्यात आलीय. तर, 498 जणांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com