
त्वरीत आणि कोणत्याही कागदपत्राशिवाय मिळणाऱ्या कर्जाच्या प्रलोभनाला बळी पडू नका असं RBI ने ग्राहकांना सांगितलं आहे.
नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व ग्राहकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा मोबाइल अॅपवरून कर्जासाठी अर्ज करत असाल तर सावध व्हा. कारण या माध्यमातून तुमच्या कागदपत्रांशी छेडछाड केली जाऊ शकते. तसचं जास्त व्याजदराने कर्जही घेतलं जाऊ शकतं. याशिवाय या पैशांच्या रिकव्हरीची पद्धतही चुकीची असते.
मोबाइल अॅप, डिजिटल प्लॅटफॉर्मवरून वैयक्तिक किंवा लहान व्यवसायासाठी अनधिकृत कर्ज घेऊ नये असं आवाहन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलं आहे. त्वरीत आणि कोणत्याही कागदपत्राशिवाय मिळणाऱ्या कर्जाच्या प्रलोभनाला बळी पडू नका असं RBI ने ग्राहकांना सांगितलं आहे.
हे वाचा - शेअर बाजाराला ‘विषाणूज्वर’; युरोपीय शेअर बाजारही तीन टक्क्यांनी कोलमडले
रिझर्व्ह बँकेनं म्हटलं की, अशा प्रकारचं कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना जास्त दराने व्याज द्यावं लागतं. यामध्ये अनेक प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारलं जातं. तसंच फोनच्या माध्यमातून तुमच्या पर्सनल डेटाचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे असे व्यवहार टाळलेले बरे असंही म्हटलं आहे.
सर्वसामान्य लोकांना सावध केलं जातंय की अशा प्रकारच्या कोणतेही व्यवहार किंवा ऑनलाइन, मोबाईल अॅपच्या माध्यमातून कर्जासाठी कागदपत्रे देऊ नयेत असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं. केवायसी डॉक्युमेट कोणत्याही अज्ञात व्यक्तीला, अनधिकृत अॅपला देऊ नये. अशा प्रकाराबाबत संबंधित कायदेशीर संस्थांना वेळीच माहिती द्यावी.
इनकम टॅक्स रिटर्न भरताय; मग नक्कीच बातमी वाचा
कर्ज घ्यायचंच असेल तर रिझर्व्ह बँकेच्या एनबीएफसी किंवा इतर संस्था ज्यांना राज सरकारकडून मान्यता आहे त्यांच्याकडून घ्यावं. यामध्ये फसवणुकीचे धोके नसतात आणि तुमची कागदपत्रे सुरक्षित असतात.