esakal | फक्त चार क्‍लिकसह डाउनलोड करा एसबीआयचे व्याज प्रमाणपत्र! जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

SBI

फक्त चार क्‍लिकसह डाउनलोड करा 'एसबीआय'चे व्याज प्रमाणपत्र !

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे.

सोलापूर : भारतीय स्टेट बॅंक (एसबीआय) (State Bank of India) ही भारतातील सर्वांत मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक आहे. जर तुम्ही त्याचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक, एसबीआयने मायक्रोब्लॉगिंग साइटवर ट्‌वीट करून अशी माहिती दिली आहे, की खातेदारांना घर बसल्या ठेवीवरील व्याज प्रमाणपत्र मिळू शकते. यासाठी एसबीआय शाखेला भेट देण्याची गरज नाही. यासाठी त्यांना फक्त त्यांच्या खात्यात लॉग इन करावे लागेल. याशिवाय त्यांनी एक सल्लाही दिला, ज्याचे पालन न केल्यास त्रास होईल. (Download SBI's Certificate of Interest with just four clicks-ssd73)

हेही वाचा: केंद्रीय विद्यालयात पहिल्या वर्गात प्रवेशाची अधिसूचना !

असे करा एसबीआय व्याज प्रमाणपत्र डाउनलोड

  • एसबीआयच्या ट्‌वीटनुसार प्रथम वापरकर्त्यांनी https://www.onlinesbi.com/ ला भेट द्यावी.

  • यानंतर खातेदारांना लॉग इन करावे लागेल.

  • लॉग इन केल्यानंतर "ई-सर्व्हिस' टॅबवर क्‍लिक करा.

  • यानंतर "माय सर्टिफिकेट'वर क्‍लिक करा.

  • यानंतर, स्क्रीनवर दिसणाऱ्या Interest Certificate of Deposit A/Cs वर क्‍लिक करा.

हेही वाचा: राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये 5858 लिपिकांची होणार भरती! अधिसूचना जारी

एसबीआयच्या सल्ल्याचे पालन न केल्यास होईल त्रास

एसबीआयने आपल्या खातेदारांना सल्ला दिला आहे आणि सांगितले, की त्यांचे पालन न केल्यास खातेधारकास अडचणीचा सामना करावा लागू शकतो. वास्तविक, एसबीआयने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्‌वीट केले आहे, की सर्व खातेधारकांनी पॅन कार्डला आधारशी जोडले पाहिजे. आपण असे न केल्यास येत्या काही दिवसांत तुम्हाला बॅंकिंग संबंधित सेवा घेताना त्रास सहन करावा लागू शकतो. अन्यथा, आपला पॅन निष्क्रिय होईल आणि त्यानंतर व्यवहार शक्‍य होणार नाही. पॅन कार्डशी आधार जोडण्यासाठी तुम्हाला www.incometax.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर, Our Services नावाची श्रेणी दिसेल. "आपला आधार पॅनसह जोडा' या पर्यायावर क्‍लिक करा. त्यानंतर खातेदारांना पॅन आणि आधार माहिती भरावी लागेल. यानंतर लिंकचा पर्याय खाली येईल. त्यावर क्‍लिक करा.

loading image