म्युच्युअल फंडात मान्सून सेल

म्युच्युअल फंडात सवलतीच्या दरात मान्सून सेल सुरू! ....हो अगदी बरोबर वाचलंत आपण! गेले काही दिवस बहुतेक सर्वच म्युच्युअल फंडात मान्सून सेल सुरु असल्याचे चित्र दिसत आहे आणि बहुसंख्य म्युच्युअल फंड डिस्काउंटमध्ये उपलब्ध
Dr Virendra Tatke writes about Mutual fund discount share market
Dr Virendra Tatke writes about Mutual fund discount share market esakal
Summary

म्युच्युअल फंडात सवलतीच्या दरात मान्सून सेल सुरू! ....हो अगदी बरोबर वाचलंत आपण! गेले काही दिवस बहुतेक सर्वच म्युच्युअल फंडात मान्सून सेल सुरु असल्याचे चित्र दिसत आहे आणि बहुसंख्य म्युच्युअल फंड डिस्काउंटमध्ये उपलब्ध

म्युच्युअल फंडात सवलतीच्या दरात मान्सून सेल सुरू! ....हो अगदी बरोबर वाचलंत आपण! गेले काही दिवस बहुतेक सर्वच म्युच्युअल फंडात मान्सून सेल सुरु असल्याचे चित्र दिसत आहे आणि बहुसंख्य म्युच्युअल फंड डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहेत. चाणाक्ष गुंतवणूकदारांनी अशा वेळी आपल्या गुंतवणुकीबाबत योग्य पवित्र घ्यायला हवा.२०२२ च्या सुरवातीला जानेवारी महिन्यात म्युच्युअल फंडांच्या निव्वळ मालमत्ता मूल्यांनी (एनएव्ही) सर्वोच्च पातळी गाठल्याचे चित्र दिसत होते. मात्र एप्रिलनंतर शेअर बाजारात पडझड सुरू झाली आणि त्याचे प्रतिबिंब म्युच्युअल फंडातदेखील पाहायला मिळाले.

जून महिन्यात तर बहुसंख्य म्युच्युअल फंडांच्या बाजारभावांनी या वर्षातील तळ गाठला. शेअर बाजारातील शेअरच्या बाजारभावातील संभाव्य चढ-उतारांचा अंदाज बांधण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाची सुविधा उपलब्ध असते. अशा विश्लेषणाची सुविधा म्युच्युअल फंड गुंतवणुकीत उपलब्ध नसते आणि त्याची फारशी आवश्यकतादेखील नसते. कारण मुळातच म्युच्युअल फंड हे दीर्घकालीन गुंतवणुकीचे साधन असल्याने त्यांच्या किमतीत अल्पकाळात होणाऱ्या चढ-उतारांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र चाणाक्ष गुंतवणूकदार अशा अल्पकालीन चढउतारांचा उपयोग आपल्या गुंतवणुकीवरील एकूण परतावा वाढविण्यासाठी करून घेतात.

उदाहरणादाखल, आपण काही म्युच्युअल फंड पाहूयात. खालील तक्त्यामध्ये इक्विटी फंडांच्या विविध प्रकारातील काही फंड प्रातिनिधिक स्वरूपात घेतले आहेत. यामध्ये मल्टिकॅप फंड, इंडेक्स फंड, लार्जकॅप फंड, मिडकॅप फंड आणि स्मॉलकॅप फंड यांचा समावेश केला आहे. या तक्त्यावरून लक्षात येते, की जानेवारी महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात म्युच्युअल फंडांचे भाव १५ ते २० टक्के कोसळले होते. जुलै महिन्यात त्यात वाढ झाली असली तरी जानेवारी महिन्याच्या तुलनेत बाजारभाव अजूनही साधारण ७ ते ८ टक्क्यांनी कमी आहेत. जुलै महिन्यात त्यात हळूहळू वाढ दिसत आहे, पण वाढीचा वेग संथ आहे. ज्यामुळे पुन्हा सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी बराच कालावधी लागेल असेल, असे दिसते आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

सर्वप्रथम आपण गुंतवणूक करत असलेल्या म्युच्युअल फंडाच्या एनएव्हीमध्ये इतर फंडांच्या बाजारभावात सरासरीइतकीच घट झाली आहे का हे पाहावे. बाजारभावात सरासरीपेक्षा अधिक घट झाली असेल तर गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने त्यामागील नेमके कारण शोधून काढावे. थोडक्यात आपण गुंतवणूक करत असलेला फंड हा मूलभूतरित्या चांगला असून आत्ता त्याच्या बाजारभावात झालेली घट अल्पकालीन आहे, याची खातरजमा करावी आणि कमी झालेल्या बाजारभावात एकरकमी गुंतवणूक करावी. ज्या गुंतवणूकदारांनी जून महिन्यात बाजार तळाला असताना एकरकमी गुंतवणूक केली होती त्यांना एका महिन्यातच त्यांच्या गुंतवणुकीवर ८ ते १० टक्के फायदा दिसत आहे. अर्थात अशी गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करावी, जेणेकरून येणाऱ्या काळात बाजार पुन्हा कोसळला तर त्यावेळी गुंतणवूक करणे शक्य होते. अर्थात याच्या जोडीला अशा म्युच्युअल फंडात आपली दीर्घकालीन एसआयपी सुरू ठेवणेदेखील अत्यंत गरजेचे आहे. नव्याने गुंतवणूक सुरू करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी जोखीम घेण्याची तयारी असेल तर सेक्टोरल फंड किंवा स्मॉल कॅप फंड निवडावेत. जोखीम कमी घ्यायची असेल तर इंडेक्स फंड निवडावा. थोडक्यात, चाणाक्ष गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडातील या मान्सून सेलचा उपयोग टप्प्याटप्प्याने दीर्घकालीन खरेदीसाठी करावा.

म्युच्युअल फंड योजना जानेवारी २०२२ मधील किंमत जून २०२२ मधील किंमत सध्याची किंमत

म्युच्युअल फंड योजना - जानेवारी २०२२ किंमत -जून २०२२ किंमत - सध्याची किंमत

एचडीएफसी टॉप १०० फंड (ग्रोथ) ७१९ ६२६ ६८२

निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंड (ग्रोथ) ९३ ७४ ८४

यूटीआय निफ्टी इंडेक्स फंड (ग्रोथ) १२३ १०३ ११२

कोटक ब्ल्यूचिप फंड (ग्रोथ ) ३९२ ३२५ ३५६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com