भारतासमोरील आर्थिक संकट आणखी काही काळ कायम

Development-Rate
Development-Rate

जीडीपी उणे १०.५ टक्क्यांवर टेकण्याचा ‘फिच’चा अंदाज
नवी दिल्ली - भारतासमोरील आर्थिक संकट आणखी काही काळ कायम राहणार आहे. या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर उणे १०.५ टक्के राहण्याचा अंदाज जागतिक पतमानांकन संस्था फिच रेटिंग्जने आज व्यक्त केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने, त्याचा देशातील आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाला आहे. त्याचा फटका देशाला बसेल, असे फिचने म्हटले आहे. ‘फिच’ने मंगळवारी जारी केलेल्या अहवालामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकासदर उणे १०.५ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याआधी त्यांनी हाच दर उणे पाच टक्के असेल असे म्हटले होते. यावर्षीच्या पहिल्या तिमाहीतील एकूण देशांतर्गत उत्पन्नाचा (जीडीपी) दर उणे २३.९ पर्यंत घसरला आहे. सलग दोन तिमाहींमध्ये जीडीपीत घट झाल्याचे चित्र आहे.

सध्या सुरु असणाऱ्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीतही ही घट कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आता ‘फिच’च्या अहवालाने आर्थिक संकटासंदर्भातील भारतीयांची चिंता आणखी वाढवली आहे.

'भारताचा जीडीपी २०२० च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये (ऑक्टोबर-डिसेंबर) उसळी घेईल. अनेक व्यवहार सुरळीत होण्याच्या पार्श्वभूमीवर हा बदल पहायला मिळेल. मात्र सध्याच्या आर्थिक संकटामधून सावरताना अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग हा संथ आणि असमान राहील अशी चिन्हे दिसत आहेत,' असे फिचने अहवालामध्ये नमूद केले आहे. 

'भारताचा जीडीपी उणे १०.५ टक्क्यांपर्यंत राहील असा आमचा अंदाज आहे. ग्लोबल इकनॉमिक आऊटलूकने जूनमध्ये व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा हा पाच टक्क्यांनी अधिक घट दिसून येणार आहे,” असेही फिचने म्हटले आहे. 

जपानलाही फटका
जपानच्या अर्थव्यस्थेमध्येही दुसऱ्या तिमाहीमध्ये विक्रमी घट झाली आहे. जपानने दिलेल्या माहितीनुसार अर्थव्यवस्थेचा विकासदर नकारात्मक असून देशाचा जीडीपी २८.१ टक्क्यांनी घसरला आहे. तेथील उद्योगांनाही कोरोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका बसला आहे. देशातील अनेक भागांमधील दुकाने, हॉटेल आणि इतर सेवा बंद आहेत. पर्यटन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com