ईडीकडून नीरव मोदी, चोक्सीचे 1,350 कोटींचे हिरे ताब्यात

वृत्तसंस्था
Wednesday, 10 June 2020

नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी या दोघांचीही प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग अॅक्टअंतर्गत चौकशी सुरू आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या 2 अब्ज डॉलरपेक्षा अधिक रकमेच्या गैरव्यवहारासंदर्भात या दोघांवरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने जप्त केलेल्या मालात 1,350 कोटी रुपयांचे पॉलिश केलेले हिरे, मोती आणि चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.

सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) नीरव मोदी आणि मेहूल चोक्सीच्या मालकीची 1,350 कोटी रुपयांचे हिरे आणि मोती ताब्यात घेतले आहेत. हॉंगकॉंग येथून ईडीने हि 2,300 किलो वजनाचे पॉलिश केलेले हिरे आणि मोती ताब्यात घेतले आहेत. मुंबईतील उतरलेल्या 108 मालांपैकी 32 नीरव मोदीद्वारे नियंत्रित होती तर उर्वरित मेहूल चोक्सीच्या कंपनीशी निगडित होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी या दोघांचीही प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग अॅक्टअंतर्गत चौकशी सुरू आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या 2 अब्ज डॉलरपेक्षा अधिक रकमेच्या गैरव्यवहारासंदर्भात या दोघांवरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने जप्त केलेल्या मालात 1,350 कोटी रुपयांचे पॉलिश केलेले हिरे, मोती आणि चांदीचे दागिने यांचा समावेश आहे. हॉंगकॉंग येथील एका लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामामध्ये हा माल ठेवण्यात आलेला होता. आज हा माल मुंबईत परत आणण्यात आला आहे. या मालाचे एकूण वजन जवळपास 2,340 किलो इतके आहे. 

अमेरिका महामंदीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता

हा माल परत आणण्यासंदर्भात हॉंगकॉंगच्या प्रशासनाबरोबरच्या कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी ईडीने पूर्ण केल्या आहेत. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग अॅक्टअंतर्गत हा माल जप्त करून ठेवण्यात येणार आहे.

क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी लक्षात घ्या 'या' टिप्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED brings back nirav modi's diamonds of worth rs. 1,350 crore