esakal | आयएनएक्स मिडिया प्रकरण: ईडीकडून पी चिदंबरम, कार्तीवर आरोपपत्र दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

p-chidambaram

सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) आयएनएक्स मिडिया प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम, त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम आणि इतरांवर आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने मनी लॉंडरिंग प्रकरणात हे आरोपपत्र दिल्ली न्यायालयात सादर केले आहे. हे आरोपपत्र ई-सुविधेच्या माध्यमातून पासवर्ड संरक्षण असलेल्या ई-फाईलद्वारे विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

आयएनएक्स मिडिया प्रकरण: ईडीकडून पी चिदंबरम, कार्तीवर आरोपपत्र दाखल

sakal_logo
By
पीटीआय

सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) आयएनएक्स मिडिया प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम, त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम आणि इतरांवर आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने मनी लॉंडरिंग प्रकरणात हे आरोपपत्र दिल्ली न्यायालयात सादर केले आहे. हे आरोपपत्र ई-सुविधेच्या माध्यमातून पासवर्ड संरक्षण असलेल्या ई-फाईलद्वारे विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र न्यायालयाने ईडीला न्यायालयाचे कामकाज नियमितपणे सुरू झाल्यावर कागदी स्वरुपात (हार्ड कॉपी) हे आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 
चिदंबरम पिता-पुत्रांव्यतिरिक्त या आरोपपत्रात कार्ती यांचे चार्टंर्ड अकाऊंटंट एस एस भास्करारामन आणि इतरांचाही समावेश आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत चिंदबरम आणि कार्ती यांच्यावर ईडीने पहिल्यांदाच आरोपपत्र दाखल केले आहे.

आर्थिक नियोजन करताना 'हे' लक्षात घ्या

मागील वर्षी २१ ऑगस्टला पी चिदंबरम यांना सीबीआयने आयएनएक्स मिडिया प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर २२ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन दिला होता. ईडीच्या प्रकरणात चिदंबरम यांना ४ डिसेंबरला जामीन मिळाला होता. २००७ मध्ये अर्थमंत्री असताना ३०५ कोटी रुपयांच्या परकी फंडासंदर्भात  केलेल्या परकी गुंतवणूक प्रसार मंडळाच्या अनियमिततेसंदर्भात सीबीआयने १५ मे २०१७ ला चिदंबरम यांच्यावर तक्रार दाखल केली होती.

निफ्टीने ओलांडली १०,००० अंशांची पातळी, सेन्सेक्सही ३४,०००च्या पार