esakal | Explained: भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती का वाढत आहेत?
sakal

बोलून बातमी शोधा

petrol.

भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीने 90 रुपयांचा आकडा पार केला आहे

Explained: भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती का वाढत आहेत?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीने 90 रुपयांचा आकडा पार केला आहे, तर डिझेलही 80 रुपयांच्या पुढे गेले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून 84.2 रुपयांच्या किंमतीवर पोहोचला आहे. मंगळवारी ऑईल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीमध्ये 23 पैशांनी वाढ केली आहे. डिझेलच्या किंमतीमध्ये 24 पैशांनी वाढ होऊन तो 74.38 रुपयांवर गेला आहे. बुधवारी ऑईल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमती 26 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 25 पैशांनी वाढवले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असल्याने याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. 

IMF ची भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 'गुड न्यूज', चीनलाही टाकणार मागे

दिल्लीत ऑक्टोबर 2018 मध्ये पेट्रोलेच्या दराने 84 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या किंमती 80 डॉलर प्रति बॅरेल होते. सध्या ब्रेन्ट ऑईलची किंमत 54 डॉलर प्रति बॅरल आहे. कोरोना महामारीमुळे क्रूड ऑईलच्या किंमती घसरल्या होत्या. त्यानंतर झालेली ही पहिली मोठी वाढ आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये साऊदी अरेबियाने क्रूड ऑईलची निर्यात 1 मिलियन डॉलरनी कमी केली होती. त्यामुळेही पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या होत्या.  

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती कमी असताना पेट्रोल-डिझेलचे दर चढे कसे? 

पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या किंमती आणि देशातील सरकार पेट्रोल-डिझेलवर लावत असलेले विविध कर. गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या किंमती कमी झाल्या असल्या तरी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर वाढवले आहेत. 

पेट्रोल-डिझेलचा भडका; देशात एका शहरात दर @100₹

केंद्र सरकारने पेट्रोलवरील एक्साईज ड्यूटी 32.98 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवली आहे. 2019 मध्ये हीच एक्साईज ड्यूटी 19.98 रुपये प्रति लिटर होती. दुसरीकडे डिझेलवरील एक्साईज ड्यूटीही 15.83 रुपयांवरुन वाढवून 31.83 रुपये प्रति लिटरपर्यंत करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या संसर्गामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठे दूरगामी परिणाम पडले आहेत. अशा परिस्थितीत उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवरील कर वाढवत आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे राज्याच्या अर्थववस्थाही डबगाईला आल्या आहेत. अशात राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (मूल्यवर्धित कर) वाढवला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती कमी असूनही राज्य आणि केंद्र सरकारच्या करांमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहे. 

loading image
go to top