esakal | लॉकडाऊन वाढवल्यामुळे अर्थव्यवस्थेबरोबरच वैद्यकीय संकटही निर्माण होईल : आनंद महिंद्रा
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊन वाढवल्यामुळे अर्थव्यवस्थेबरोबरच वैद्यकीय संकटही निर्माण होईल : आनंद महिंद्रा

सद्य परिस्थितीत लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे फक्त आर्थिक संकटच निर्माण होणार नाही तर त्यामुळे वैद्यकीय संकटसुद्धा निर्माण होईल, असे मत महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे.

लॉकडाऊन वाढवल्यामुळे अर्थव्यवस्थेबरोबरच वैद्यकीय संकटही निर्माण होईल : आनंद महिंद्रा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सद्य परिस्थितीत लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे फक्त आर्थिक संकटच निर्माण होणार नाही तर त्यामुळे वैद्यकीय संकटसुद्धा निर्माण होईल, असे मत महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे. कोरोना महामारीमुळे सध्या देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रा यांनी आपले मत मांडले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सरकारसमोर असलेले पर्याय सोपे नाहीत. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढवून हाती काही येणार नाही, असे मत पुढे महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे.
लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे देशासमोर फक्त आर्थिक संकटच उभे ठाकणार नाही तर आणखी एक वैद्यकीय संकटदेखील उभे राहील, असे आपण आधीदेखील टविट केल्याचे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

टाटा समूहाकडून वेतन कपात; सीईओ आणि एमडींच्या वेतनात 20 टक्क्यांची कपात

'लॉकडाऊनचे भयानक मानसिक परिणाम आणि बिगर कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष होण्याची मोठी जोखीम', या लेखाकडे लक्ष वेधत महिंद्रा यांनी वरील परखड मत व्यक्त केले आहे. याआधी महिंद्रा यांनी ४९ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व कामकाज पूर्ववत करण्याची सूचना केली होती. सरकारसमोर असलेले पर्याय अवघड आहेत, मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढवून फारसे काही साध्य होणार नाही, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

देशातील कोविड-१९च्या रुग्णांची संख्या वाढतच जाणार आहे. आपले लक्ष देशभरातील हॉस्पिटल आणि त्यातील खाटांची संख्या वाढवण्यावर असले पाहिजे. जास्तीत वेंटिलेटर आणि वैद्यकीय सेवा उभी करण्यावर आपण भर दिला पाहिजे. आपल्या लष्कराकडे यासंदर्भात मोठी क्षमता आहे, असेही पुढे महिंद्रा म्हणाले.

हेही वाचा : कोरोनाच्या संकटात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 'या' टिप्स घ्या लक्षात​

२२ मार्चला सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर कोविडमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसंदर्भात महिंद्रा यांनी चिंता व्यक्त केली होती.