सावधान! FASTag शी निगडीत या चुका करु नका, नाहीतर बसेल मोठा भुर्दंड

सकाळ ऑनलाइन टीम
Sunday, 21 February 2021

येणाऱ्या काळात पार्किंग किंवा इतर ठिकाणी तुमच्या कारची ओळख तुमच्या फास्टॅगवरुन करेल. त्यामुळे आपण अधिक सावध असणे गरजेचे आहे.

नवी दिल्ली- देशभरात FASTag बंधनकारक केले आहे. त्या अंतर्गत FASTag नसलेल्या वाहनांकडून टोल नाक्यावर दुप्पट टोल घेतला जात आहे. दरम्यान, FASTagची व्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून लागू आहे. मोठ्या संख्येने याचा उपयोगही केला जात आहे. आता अनेक फास्टॅग वॉलेटशी लिंक आहेत. त्यामध्ये तुम्हाला पैसे भरावे लागतात. तर अनेक बँकांचे फास्टॅग थेट खात्याशी लिंक आहेत. टोल नाक्यावर जाताच लगेच बँकेच्या खात्यातून पैसे वजा होतात. परंतु, FASTag बाबत सावध राहणेही तितकेच गरजेचे आहे. जर वेळोवेली तुम्ही लक्ष दिले नाही तर तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. 

नेहमी लोक आपली जुनी कार विकतात. परंतु, ते आपला फास्टॅग काढायचं विसरुन जातात किंवा तो डिऍक्टिवेट करत नाहीत. त्यामुळे फास्टॅग तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर कार विकल्यानंतर फास्टॅगच्या वापरानंतर पैसे थेट आपल्या बँकेतून कापले जातील. 

हेही वाचा- ''सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलाल तर देशद्रोही ठराल''

FASTagचा उपयोग सरकार वाढवत आहे. येणाऱ्या काळात पार्किंग किंवा इतर ठिकाणी तुमच्या कारची ओळख तुमच्या फास्टॅगवरुन करेल. त्यामुळे आपण अधिक सावध असणे गरजेचे आहे. कार विकताना किंवा एक्सचेंज करताना गाडीवरील फास्टॅग काढले पाहिजे. किंवा डिऍक्टिवेट केले पाहिजे. नाहीतर तुमच्या गाडीतून नवीन ग्राहक प्रवास करेल आणि पैसे तुमच्या खात्यातून वजा होत राहील. 

जुने फास्टॅग डिऍक्टिवेट करण्यासाठी तुमच्याकडे फास्टॅगमध्ये नोंदवलेला सीरियल नंबर असणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला ते डिऍक्टिवेट करता येणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे जितक्याही कारमध्ये फास्टॅग असतील त्याच्या सीरियल नंबरची नोंद ठेवणे गरजेचे आहे. 

हेही वाचा- कोकेन प्रकरणः भाजप नेत्या पामेलांनी घेतलं कैलाश विजयवर्गीयांच्या सहकाऱ्याचे नाव

कार विकत असा किंवा एक्सचेंज सर्वात आधी फास्टॅग काढून टाका. जर एखाद्या वेळेस फास्टॅग तसाच राहिला तर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरुन FASTagच्या टोल फ्री नंबर 1800-120-4210 वर कॉल करावा लागेल. तेथून तुमच्या मोबाइलवर लिंक येईल. त्यावर तुम्ही तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, फास्टॅगचा सीरियल नंबर टाकणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुमचा फास्टॅग डिऍक्टिवेट होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fastag Rules and guidelines avoid loss check details