"टॅक्स हेवन' देशांतून भारतात "एफडीआय' वाढतोय

वृत्तसंस्था
Wednesday, 10 June 2020

भारतात 2018-19 मध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली केली होती. त्या आधी वर्ष2017-18 मध्ये 1.23 अब्ज डॉलरची गुंतवणूक केमन बेटांवरून झाली होती. जे युनायटेड किंडमच्या सीमेत आहे. त्याचप्रमाणे सायप्रसमधून येणाऱ्या परकी गुंतवणूक तीन पट वाढ झाली आहे. ती गेल्या आर्थिक  वर्षात (2018-19) 29.6 कोटी डॉलर होती. ती थेट आता 87.9 कोटी डॉलरवर पोचली आहे. तर 2017-18 वर्षात 41.7 कोटी डॉलरची गुंतवणूक झाली होती.

केमन बेटे भारतात थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) करणारे पाचवा सर्वात मोठा गुंतवणूकदार ठरला आहे. थेट परकी गुंतवणुकीमध्ये तीन पट वाढ होत ती वर्ष 2019-20 मध्ये 3.7 अब्ज डॉलरवर पोचली आहे, अशी माहिती "डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड'ने (डीपीआयआयटी) दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतात 2018-19 मध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली केली होती. त्या आधी वर्ष2017-18 मध्ये 1.23 अब्ज डॉलरची गुंतवणूक केमन बेटांवरून झाली होती. जे युनायटेड किंडमच्या सीमेत आहे. त्याचप्रमाणे सायप्रसमधून येणाऱ्या परकी गुंतवणूक तीन पट वाढ झाली आहे. ती गेल्या आर्थिक  वर्षात (2018-19) 29.6 कोटी डॉलर होती. ती थेट आता 87.9 कोटी डॉलरवर पोचली आहे. तर 2017-18 वर्षात 41.7 कोटी डॉलरची गुंतवणूक झाली होती.

'टर्म इन्श्युरन्स', आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा खांब

तज्ज्ञांच्या मते, केमन आयलँडच्या माध्यमातून भारतात गुंतवणूक करण्याच्या लोकप्रिय मार्ग झाला आहे. कारण त्यामार्गाने येणाऱ्या गुंतवणुकीची प्रत्यक्ष करातून सुटका होते.

भारतातील थेट परकी गुंतवणूक वाढत असून केमन आयलँड अशा प्रकारे गुंतवणूक वळविण्यासाठी लोकप्रिय मार्ग ठरत आहे. "टॅक्स हेवन' देशांमधून वाढत्या गुंतवणुकीमुळे मात्र मनी लॉडरिंगच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. परिणामी नियामक मंडळ अशा प्रकारच्या नवीन "ट्रेंड'मुळे चिंतेत आहे. सायप्रस युरोपात सर्वाधिक कमी "टॅक्स रेट' म्हणून उभरते आहे. गेल्या आर्थिक वर्षात सिंगापूर भारतातील सर्वात मोठा गुंतवणूकदार देश ठरला आहे. त्यापाठोपाठ मॉरिशस, नेदरलँड आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये थेट परकी गुंतवणूक 13 टक्क्यांनी वाढत 50 अब्ज डॉलरवर पोचली आहे.

 अमेरिका महामंदीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FDI in india is increasing