31 मार्चच्या आधी करुन घ्या 'ही' कामे; अन्यथा आर्थिक वर्ष संपल्यानंतर होईल पश्चात्ताप

31 march
31 march

नवी दिल्ली : 1 एप्रिल 2021 पासून नवं आर्थिक वर्ष सुरु होत आहे. या नव्या आर्थिक वर्षांत अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट आपल्या खिशावर परिणाम होणार आहे. तसेच बँकेपासून ते इनकम टॅक्स विभागाशी संबंधित काही गरजेच्या कामांची डेडलाईन ही 31 मार्च 2021 आहे. जर तुम्ही 31 मार्चच्या आधी तुमची ती कामे  पूर्ण केली नाहीत तर तुम्ही नंतर अडचणीत सापडू शकता, हे नक्की... SBI आणि ICICI बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्वांत स्वस्त होम लोनपासून देखील आपण वंचित राहू शकता. 

ICICI बँकेचं सर्वांत स्वस्त होमलोन 31 मार्चपर्यंत
ICICI बँकेने होमलोनचे व्याज 6.70 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. ग्राहक या व्याजदराचा लाभ 75 लाख रुपयांपर्यंतच्या होमलोनसाठी घेऊ शकतात. तर 75 लाखांहून अधिक कर्जाचा व्याजदर 6.75 टक्के आहे. बँकेने या व्याजदराची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंतच वैध ठेवली आहे. हा या दशकातील सर्वांत कमी दर आहे. 

PNB च्या ग्राहकांनी 31 मार्चपर्यंत करावीत ही कामे
जर आपण PNB चे खातेधारक आहात तर आपल्याला 31 मार्चच्या आधी ही कामे करावी लागतील अन्यथा आपली आर्थिक देवघेव थांबू शकते. PNB सांगितलंय की, जुन्या IFSC आणि MICR कोडला 1 एप्रिलपासून बदललं जाईल. म्हणजेच 31 मार्चनंतर नवे कोड लागू होतील जे आपल्याला बँकेकडून प्राप्त करावे लागतील. 

आधार-पॅन कार्ड लिंक करणे
हे खूपच महत्त्वाचे काम असून सरकारकडून याबाबत वारंवार निर्देश दिले जात आहेत. जर आपण आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर 31 मार्चपर्यंत ते करुन घ्यावं. जर या तारखेपर्यंत या दोन्हींचं लिंकींग झालं नाही तर तुमचं पॅन कार्ड रद्दबातल ठरू शकतं. आजकाल सगळ्याच कामांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्डची गरज असते त्यामुळे हे काम खूपच महत्त्वपूर्ण आहे. 

SBI देतंय 6.7 टक्के व्याजदराने 75 लाखांचं होम लोन
SBI होमलोन अंतर्गत 31 मार्चपर्यंत होमलोन घेणाऱ्यांना प्रोसेसिंग फीवर 100 टक्क्यांची सवलत मिळू शकते. 

पीएम किसान योजनेमध्ये 31मार्चपर्यंत रजिस्ट्रेशन
पीएम किसान योजनेअंतर्गत मोदी सरकार वर्षाला 6000 रुपये देते. जे लोक या योजनेमध्ये आपलं रजिस्ट्रेशन करु शकले नाहीयेत, त्यांनी जर 31 मार्चच्या आधी अर्ज केला तर त्यांचं हा अर्ज स्विकारला जाऊ शकतो. त्यानंतर त्यांना एप्रिल अथवा मेमध्ये 2000 रुपयांचा हप्ता प्राप्त होऊ शकतो. 

KCC मिळवण्याची अंतिम तारीख 31 मार्च
जर तुम्ही शेतकरी असाल आणि आपलं किसान क्रेडीट कार्ड अद्याप मिळालं नाहीये, तर निराश होऊ नका. सरकार 31 मार्चपर्यंत अभियान चालवून किसान क्रेडीट कार्ड बनवत आहे. आपल्या नजीकच्या बँक शाखेमध्ये संपर्क करुन फॉर्म भरुन हे कार्ड आपण मिळवू शकता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com