‘फिनोलेक्स’चा तिमाहीतील नफा २५५.८६ कोटींवर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील सर्वांत मोठ्या आणि पीव्हीसी पाइप्स व फिटिंग्जची एकमेव सर्वसमावेशक उत्पादक असलेल्या कंपनीने आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे ऑडिटपूर्व आर्थिक निकाल जाहीर केले.

पुणे - फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील सर्वांत मोठ्या आणि पीव्हीसी पाइप्स व फिटिंग्जची एकमेव सर्वसमावेशक उत्पादक असलेल्या कंपनीने आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे ऑडिटपूर्व आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीचा तिसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफा १७४.२ टक्क्यांनी वाढून २५५.८६ कोटी रुपयांवर पोचला आहे. 

कामकाजाचे एकूण उत्पन्न आर्थिक वर्ष २०२० तिसऱ्या तिमाहीतील ६९९.४० कोटी रुपयांवरून ५२.५ टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत १०६६.८८ कोटी रुपयांवर पोचले आहे. तिसऱ्या तिमाहीतील १३८.९६ कोटी रुपये ईबीआयटीडीए १४९.५ टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत ३४६.६६ कोटी रुपयांवर तर तिसऱ्या तिमाहीतील ९३.३२ कोटी रुपयांचा करोत्तर नफा १७४.२ टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत २५५.८६ कोटी रुपये झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अध्यक्ष प्रकाश पी. छाब्रिया म्हणाले, ‘कोरोना महामारीमुळे अतिशय आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचे जागतिक व भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाले. मात्र, या परिस्थितीने भारताला स्वयंपूर्ण बनण्यास प्रोत्साहन दिले, तसेच राष्ट्राच्या कल्याणासाठी आत्मनिर्भर भारत उभारण्याच्या संकल्पनेला चालना मिळाली. मात्र, पुरवठा साखळी विस्कळित झाल्यामुळे जगभरातील कमॉडिटीजच्या किमतीत वाढ झाली व त्याचा तयार मालाच्या किमतीवर थेट परिणाम झाला. २०२१ चा अर्थसंकल्प या दशकातला सर्वात महत्त्वाचा आहे. गुंतवणूकदार आणि भागधारकांना स्थिर करण्यासाठी सरकारने सर्वोत्तम प्रयत्न केला, असे आम्हाला वाटते.

‘कायगर’ विरुद्ध ‘मॅग्नाईट’

देशाच्या विकासाला चालना
अर्थसंकल्पात सर्व संबंधित क्षेत्रांसाठी व्यापक स्तरावर योग्य विभाजन करण्यात आल्याचे दिसत असून त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. सरकारने जाहीर केलेल्या गृहक्षेत्रासाठी करसवलतींचा विस्तार, जल जीवन मिशनसाठी जास्त चालना, शेती कर्जामध्ये सुधारणा आणि ग्रामीण पायाभूत सुविधा निधीसाठी तरतूद अशा उपक्रमांमुळे पीव्हीसी पाइप क्षेत्राचे पुनरुज्जीवन आणि शाश्वतीसाठी दीर्घकाळात मदत होईल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finolexs quarterly profit rises to Rs 255 crore