३१ मार्चपूर्वी 'या' स्पेशल FD स्कीम्समध्ये करा गुंतवणूक

Fixed Deposit Interest Rate Special FD schemes for senior citizens going to end soon
Fixed Deposit Interest Rate Special FD schemes for senior citizens going to end soon
Summary
  • विशेष FD योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी सामान्य नागरिकांच्या तुलनेत ०.५० अतिरिक्त व्याज मिळू शकते.

  • नियमित व्याज पर्याय ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवृत्तीनंतर जीवनात स्थिर उत्पन्न मिळविण्यात मदत करतात.

  • HDFC बँक आणि बँक ऑफ बडोदा दोन FD योजना 31 मार्च 2022 रोजी बंद करत आहेत.

Fixed Deposit: काही बँकानी वरिष्ठ नागरिकांसाठी स्पेशल फिक्स्ड डिपॉजिट (FD) योजना सुरू केल्या आहेत. सामान्य नागरिकांच्यातुलनेत ६० वर्षपेक्षा जास्त वयोगटातील एफडीवर जास्त (Fixed Deposit Interest Rate)व्याज मिळणार आहे. अतिरिक्त व्याजासह त्यांना नियमित व्याज दिले जाते आणि अनेक लाभ मिळतात.

या विशेष FD योजनांचा कालावधी किमान 7 दिवसांपासून कमाल 10 वर्षांपर्यंत असू शकतो. SBI बँक, ICICI बँक, Axis बँक आणि IndusInd Bank सारख्या मोठ्या कर्जदात्यांनी त्यांच्या FD च्या व्याजाचा दर वाढविला आहे.

महामारीच्या काळात, अनेक बँकांनी या विशेष एफडी योजना सुरू केल्या होत्या, परंतु आता एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा 31 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा योजना टप्प्याटप्प्याने बंद करत आहेत. या योजनांबद्दल जाणून घेऊया-

Fixed Deposit Interest Rate Special FD schemes for senior citizens going to end soon
MPSC प्रशासकीय अधिकारी पदांसाठी भरती, असा करा अर्ज

एचडीएफसी बँक

HDFC बँकेची सीनियर सिटीझन केअर एफडी (Senior Citizen Care FD) मे 2020 मध्ये लाँच करण्यात आली होती, ती 31 मार्च 2022 रोजी संपेल. या अंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 5 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी अतिरिक्त 0.25 टक्के प्रीमियम मिळतो. योजनेअंतर्गत नियमित प्रीमियम 0.50 टक्के आहे.

बँक 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीच्या मॅच्यूर होणाऱ्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर 5.60 टक्के परतावा देते, तर वृद्धांना 6.35 टक्के लाभ मिळतो.

Fixed Deposit Interest Rate Special FD schemes for senior citizens going to end soon
Gold Sliver Rate : सोने-चांदी महागलं, जाणून घ्या आजचा दर

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda, BoB)

बँक ऑफ बडोदाने २०२२मध्ये (Bank of Baroda, BoB) एक खास योजना सुरू केले आहे. आता ही ३१ मार्च २०२२ला संपणार आहे. या अंतर्गत २ कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये वरिष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज मिळते. ७ दिवसांपासून ५ वर्षांमध्ये मॅच्यूअर होणाऱ्या २ कोटींपेक्षा कमी एफडीवर बँक वरिष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त रिर्टन देत आहे. तेच ५ वर्ष ते १० वर्षाच्या FDवर त्यांना १ टक्के अतिरिक्त रिटर्न दिला जातो.

बँक ऑफ बडोदा 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंत मुदतीच्या ठेवींवर 5.25 टक्के नियमित व्याज दर देते, परंतु वृद्धांना 6.25 टक्के दराने व्याज मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com