फ्रान्सच्या तेल कंपनीकडून औरंगाबादेत प्रकल्पासाठी चाचपणी

टोटल एनर्जीज
टोटल एनर्जीज
Summary

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार टोटल एनर्जी या कंपनीने इन्व्हेंट इंडियाच्या माध्यमातून औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी संपर्क साधला. बैठकीत स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून इंडो-फ्रेंच संबंधाची माहिती देण्यात आली.

औरंगाबाद : जगातील सर्वांत मोठी समजली जाणारी फ्रान्सची French Oil Company तेल कंपनी औरंगाबादेत Aurangabad बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी चाचपणी करत आहे. यासंदर्भात बुधवारी (ता.१६) ऑनलाइन बैठक झाली. या कंपनीसाठी राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिफारस केली असून, प्रसिद्ध उद्योगपती अदानी यांनी पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नांना यश मिळाल्यास मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. टोटल एनर्जीज Total Energies या कंपनीने महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे Aurangabad Smart City Development Corporation मुख्याधिकारी आस्तिककुमार पांडेय Astik Kumar Pandey यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी, टोटल एनर्जीजचे ज्युल डिओर, अदानी उद्योग समूहाच्या ग्रीन एनर्जी लिमिटेडचे प्रताप मोंगा, इन्व्हेंट इंडियाचे वेदांत राज आदी उपस्थित होते. बैठकीनंतर महापालिकेतर्फे सांगण्यात आले की, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार टोटल एनर्जी या कंपनीने इन्व्हेंट इंडियाच्या माध्यमातून औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी संपर्क साधला. बैठकीत स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून इंडो-फ्रेंच संबंधाची Indo-French Relation माहिती देण्यात आली. पांडेय यांनी यावेळी सांगितले की, मराठवाड्यात Marathwada शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पशुधनही उपलब्ध आहे. तसेच विविध जिल्ह्यांत चारा छावण्या सुरू केल्या जातात. अशा छावण्यांतून वाया जाणाऱ्या घटकांचा जैव ऊर्जा उत्पादनासाठी उपयोग होऊ शकतो.French Oil Company Visits Aurangabad For Project

टोटल एनर्जीज
शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचे आव्हान, तयारी निवडणुकीची

कंपनीने मागवली माहिती

प्रशासकांनी दिलेल्या माहितीनुसार व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात आलेले सादरीकरणानंतर टोटल एनर्जीजच्या प्रतिनिधींनी कच्च्या मालाच्या उपलब्धतेबद्दलची माहिती मागवली आहे, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. कंपनीने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यास मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com