esakal | पेट्रोल डिझेलचा भडका; दोन महिन्यात 29 वेळा दर वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol

पेट्रोल डिझेलचा भडका; दोन महिन्यात 29 वेळा दर वाढले

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - गेल्या महिन्याभराच्या कालावधीत पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. सोमवारी इंधन दर स्थिर होते. मात्र मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा दरात वाढ केली. आज पेट्रोलच्या दरात 28 पैसे प्रति लीटर तर डिझेल 26 पैसे प्रति लीटर इतके महाग झाले. महिन्याभरातील दरवाढीमध्ये दर दोन दिवसांनी इंधनाचे दर बदलत असल्याचं दिस आहे. 3 मे पासून आतापर्यंत जवळपास 29 वेळा पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. आतापर्यंत जवळपास 7.18 रुपयांनी पेट्रोल तर 7.45 रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

दिल्लीत पेट्रोलचे दर 97.50 रुपये तर डिझेल 88.23 रुपये प्रति लीटर झाले आहे. देशातील काही ठिकाणी पेट्रोल डिझेलचे दर शंभरीच्या वर पोहोचले आहेत. चेन्नईत पेट्रोल 98.65 रुपये तर डिझेल 92.83 रुपये दराने विकले जात आहे. कोलकात्यात 97.38 रुपये आणि डिझेलची किंमत 91.08 रुपये प्रति लीटर झाली आहे.

हेही वाचा: देशात लसीकरणाचा विक्रम; एकाच दिवशी 85 लाख जणांना लस

मुंबईत पेट्रोलचे दर 103.63 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेल 95.72 रुपये प्रति लीटर झालं आहे. भोपाळमध्ये पेट्रोल तब्बल 105.72 रुपये प्रति लीटर दराने विक्री होत असून डिझेलची किंमती 96.93 रुपये इतकी झाली आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेची ब्रिटनला धास्ती; हिवाळ्यात लॉकडाउनची शक्यता

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. परकीय चलनांसहित आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत काय आहे या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवल्या जातात.

loading image