esakal | आर्थिक वर्ष 2022 मध्ये GDP 10.5 टक्के राहणार - RBI
sakal

बोलून बातमी शोधा

shaktikant das

दर कमी करण्याचा किंवा यात बदल करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये GDP 10.5 टक्के राहणार - RBI

sakal_logo
By
सूरज यादव

कोरोनाच्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे आणि कोरोना नंतर परिस्थिती कशी असेल याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. अर्थव्यवस्था आणि लोकांच्या प्रश्नांना सध्या प्राधान्य देण्याचा विचार आहे. तसंच ग्राहकांच्या संरक्षणाकडेही लक्ष असल्याचं त्यांनी म्हटलं.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं की, आर्थिक वर्ष 2022 साठी आरबीआयने अंदाजे जीडीपी वृद्धी दर 10.5 टक्के आहे. हा दर कमी करण्याचा किंवा यात बदल करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँकेनं 2021-22 मध्ये आर्थिक वृद्धी दर 10.5 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला होता.

हेही वाचा: एक मायक्रो कॅप कंपनी मोठी भरारी घेण्याच्या तयारीत; बनू शकतो तुफान पैसा

देशाच्या जीडीपीमध्ये गेल्या आर्थिक वर्षात (2020-21) मध्ये 7.3 टक्क्यांनी घसरण झाली होती. तसंच सुरुवातसुद्धा मोठ्या घसरणीने झाली होती. तर चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली. जानेवारी-मार्च 2021 च्या तिमाहीत 1.6 टक्के वाढ झाली.

दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात युपीआय प्लॅटफॉर्ममुळे स्मार्टफोनच्या माध्यमातून व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. जून 2021 मध्ये 280 कोटी व्यवहार झाले आहेत. डिजिटल व्यवहार IMPS आणि UPI च्या माध्यमातून सहज होत आहेत. गेल्या महिन्याभरातील आकडेवारीनुसार प्रत्येक दिवसाला 15 कोटी व्यवहार झाले आहेत. यामध्ये जवळपास साडेचार कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाल्याचंही दास यांनी म्हटलं.

loading image