esakal | एक मायक्रो कॅप कंपनी मोठी भरारी घेण्याच्या तयारीत; बनू शकतो तुफान पैसा
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

एक मायक्रो कॅप कंपनी मोठी भरारी घेण्याच्या तयारीत; बनू शकतो तुफान पैसा

sakal_logo
By
सुमित बागुल

तुम्ही शेअर बाजारात दीर्घ काळ नफा देणाऱ्या स्टॉकच्या शोधात आहात तर Patels Airtemp (India) Ltd चा विचार नक्की करा. हिट एक्सचेंजर आणि प्रेशर वेसल्सचा व्यवसाय करणाऱ्या या कंपनीचा पाया खूप मजबूत असल्याचे दिसून येते आहे.

कंपनीचा बिझनेस खूप मजबूत

Patels Airtemp (India) Ltd कंपनीची कॅप साइज छोटी आहे पण ग्रोथ चांगली होऊ शकते. मार्केट कॅपचा विचार केला तर ही कंपनी मायक्रोकॅप मध्ये येते. कंपनीचा बिझनेस खूप मजबूत आहे तसेच कॅशची कंपनीकडे काही कमी नाही. कंपनीवर कर्जही अत्यंत कमी आहे. कंपनीचे 20 टक्के उत्पन्न एक्सपोर्टमधून येते.

हेही वाचा: येत्या काळात मिळवा बक्कळ पैसे, दमदार शेअर्सची यादी आणि टार्गेट्स

एक्सपान्शन प्लान जवळपास पूर्ण

Patels Airtemp (India) Ltd छोटी साइजची कंपनी आहे, ज्याचा मार्केट कॅप 100 कोटी रुपयांच्या आसपास आहे. ही कंपनी मायक्रोकॅप श्रेणीमध्ये येते. कंपनीच्या विस्ताराचा प्लॅन जवळपास पूर्ण झाला आहे. कंपनी आपल्या कॅपेसिटीमध्ये तब्बल 50 टक्के वाढ करणार आहे. Patels Airtemp ची बॅलन्सशीट मजबूत आहे. त्यांना ऑर्डर्सही चांगल्या मिळत आहेत. कंपनीवर कर्जही कमी आणि जे आहे ते सुद्धा एक्स्पान्शनसाठी घेतले आहे. जर डेट रिपेमेंट फास्ट झाले तर बॅलेंसशीट आणखी मजबूत झालेली पाहायला मिळेल. कंपनी यावर्षी 35 रुपये आणि पुढच्या वर्षी 42 रुपयांचा ईपीएस करू शकते. त्यामुळेच बाजार जेव्हाही कमजोर असेल, तेव्हा या स्टॉकला हळूहळू पोर्टफोलियोमध्ये वाढवू शकता.

हेही वाचा: Petrol Diesel Price: इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस

19 कोटींची गुंतवणूक ग्रीन फील्ड प्रोजेक्टवर

Patels Airtemp हिट एक्सचेंजर, प्रेशर वेसल्स रेफ्रिजरेटर इक्विपमेंट बनवण्याचे काम करते. कंपनील या कामाचा 46 वर्षांचा अनुभव आहे. कंपनीचा क्लायंट बेस अत्यंत मजबूत आहे आणि त्याची संख्या 550 पेक्षाही जास्त आहे. ऑईल अँड गॅस सेग्मेंटमध्ये कंपनीचे बरेच क्लायंट्स आहेत. ही कंपनी 19 कोटींची गुंतवणूक ग्रीन फील्ड प्रोजेक्टवर करणार आहे. वाढत्या मागणीमुळे कंपनी विस्तार करत आहे. नव्या ऑर्डर्ससुद्धा येत आहेत. स्टॉक चांगल्या व्हॅल्युएशनवर आहे आणि या भावावर खरेदी करणे योग्य असं तज्ज्ञ सांगतात.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image