Gold Silver Price: मागील सत्रातील घसरणीनंतर आज सोने, चांदीच्या दरात वाढ

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 14 October 2020

भारतात ऑगस्ट महिन्यातील 7 तारखेला सोन्याचे दर आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 56 हजार 200 पर्यंत गेले होते. तर चांदीच्या दरानेही 80 हजारांचा जवळ मजल मारली होती.​

नवी दिल्ली: देशातील सराफा बाजारात मागील सत्रात सोने, चांदीच्या दरात वाढ दिसली होती. आज एमसीएक्सवर डिसेंबरच्या सोन्याच्या दरात 0.19 टक्क्यांची वाढ होऊन सोने 50 हजार 343 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. तर चांदीच्या दरातही वाढ दिसून आली आहे. चांदीचे दर 0.3 टक्क्यांनी वाढून 60 हजार 738 प्रति किलो झाले आहे. मागील सत्रात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमला 850 घसरले होते तर चांदीचे दर 2 हजार 600 रुपये प्रति किलोंनी कमी झाले होते. 

जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती-
जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दर काही प्रमाणात वाढताना होताना दिसले. मागील सत्रात 1.6 टक्क्यांनी घसरलेले सोने आज 1892.80 डॉलर प्रति औंसपर्यंत गेले आहे. मंगळवारी सोने मागील तीन आठवड्यातील न्यूनत्तम किंमतीवर आल्यानंतर डॉलरचा दरही स्थिर झाला होता. तर चांदीचे दर 0.2 टक्क्यांनी वाढून प्रति औंस 24.22 डॉलरने वाढले आहे. 

...आणि भाजपवाले म्हणाले, तुम्ही Dream-11 वर टीम बनवा, आपची खोचक टीका

भारतात ऑगस्ट महिन्यातील 7 तारखेला सोन्याचे दर आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 56 हजार 200 पर्यंत गेले होते. तर चांदीच्या दरानेही 80 हजारांचा जवळ मजल मारली होती. हे सोने, चांदीचे दर आतापर्यंतचे सर्वाधिक ठरले आहेत. सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या दरांचा इतिहास पाहिला तर ते नेहमी जागतिक संकटांच्या वेळेस वाढले आहेत. 

सासू सुनेचे प्रेम ठरले लव जिहादचे कारण; तनिष्कच्या  ''त्या'' जाहिरातीवर बंदी

नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत आहेत. आता अमेरिकेत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठीच्या प्रोत्साहन पॅकेजची संभावना धूसर झाली आहे. व्हाईट हाऊसच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी १८ ट्रिलियन डॉलर्सचा प्रस्ताव फेटाळूनही लावला आहे, त्याला कारण देताना नॅन्सी म्हणाल्या होत्या की, कोरोना काळात हे पॅकेज पुरेसे नाही असं त्या म्हणाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold and silver price rises in india and international market