Gold silver prices: सोने, चांदीच्या दरातील घट सुरुच; माहिती करून घ्या आजचे दर

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 2 December 2020

जागतिक पातळीवरील बाजारातील बदलामुळे भारतीय बाजारपेठेत सोने-चांदीचे दर कमी झाले आहेत.

नवी दिल्ली: जागतिक पातळीवरील बाजारातील बदलामुळे भारतीय बाजारपेठेत सोने-चांदीचे दर कमी झाले आहेत. एमसीएक्समध्ये फेब्रुवारी महिन्यात विक्रीसाठी असणाऱ्या सोन्याचे दर  0.24 टक्क्यांनी घसरून 48 हजार 449 रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. तर चांदीच्या दरात एक टक्क्यानी घट होऊन 62 हजार 559 रुपये प्रति किलो झाली. मागील सत्रात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. सोने 1.4 टक्क्यांनी म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 700 रुपयांनी वाढले होते. ऑगस्टमध्ये सोन्याचे दर उच्चांकी 56 हजार 200 पर्यंत वाढले होते.

जागतिक बाजारपेठेत किंमतीत घट-
मागील सत्रात सोन्याच्या दरात 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. त्यानंतर आज जागतिक बाजारपेठेतील सोन्याचे भाव आज घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोने 0.1 टक्क्यांनी घसरून 1813.75 डॉलर प्रति औंस झाले आहे.

चांदी प्रति औंस 23.89 डॉलर-
चांदी 0.5 टक्क्यांनी घसरून 23.89 डॉलर प्रति औंस झाली, तर प्लॅटिनम 0.6 टक्क्यांनी घसरून 994 डॉलरवर आले आहे. तर पॅलेडियम 0.4 टक्क्यांनी घसरून 2397 डॉलरवर आले.

Signs of economic revival: क्रेडिट कार्डच्या मागणीत होतेय वाढ

सोने- चांदीच्या किंमतीवर कशाचा प्रभाव पडतोय-
-कमकुवत झालेला अमेरिकन डॉलर
- प्रमुख अर्थव्यवस्थांची संमिश्र आर्थिक आकडेवारी
- कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती
-अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी प्रोत्साहन पॅकेज

भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार- 
भारतात 2020मध्ये सोन्याची आयात वाढून ऑगस्टमध्ये 3.7 अब्ज डॉलर झाली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 1.36 अब्ज डॉलरची होती. चीननंतर भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार आहे. भारतात सोन्यावर 12.5 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी लागतो.

Covid 19 Impact: पुढील वर्षात 10 टक्क्यापर्यंत वाढणार NPA; रेटिंग एजन्सीचा अंदाज

भारताकडील सोन्याचा साठा- 
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (World Gold Council) अहवालानुसार भारतात सध्या 653 मेट्रिक टन सोने आहे. यामुळे सर्वाधिक गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold and silver prices falls again in indian market