
मागील काही दिवसांत झालेल्या नफावसुलीने सोन्याचा भाव पाच महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आला होता. आता पुन्हा त्यात दर वाढ होऊ लागली आहे असे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
नागपूर : रुपयाच्या तुलनेत डॉलरमध्ये घसरण झाल्याने सोने आणि चांदीच्या भावामध्ये अचानक वाढ झाली. सोने एक हजार रुपये दहा ग्रॅम तर चांदी प्रती किलो दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचे दर ५० हजार ७०० रुपयांवरून ५१ हजार ७०० तर चांदी प्रति किलो ६७ हजार ५०० रुपयांवरून ६९ हजार ५०० रुपयावर पोहोचली आहे.
भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी होत असताना जगभरात कोरोना विषाणूंच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ झाली. तसेच अमेरिकेत मोठ्या पॅकेजच्या चर्चेमुळेही धातूंच्या किमतीवर परिणाम झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
अनलॉकअंतर्गत सरकारने विवाह सोहळ्याला शंभर लोकांच्या उपस्थितीला मान्यता दिली. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने सराफ व्यावसायिकांकडून सोन्याची खरेदी वाढली असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे होते. सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळू लागला होता. त्यात खरेदी वाढताच पुन्हा भाव वाढले.
मागील काही दिवसांत झालेल्या नफावसुलीने सोन्याचा भाव पाच महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आला होता. आता पुन्हा त्यात दर वाढ होऊ लागली आहे असे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोने चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.
२०२० मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. त्याआधी २०१९ मध्येही सोन्याला झळाळी मिळाली होती. नव्या वर्षातही सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या सोनं ५१ हजार ७०० तर चांदी प्रति किलो ६७ हजार ५०० रुपयांवरून ६९ हजार ५०० रुपयावर पोहोचली आहे. २०२१ मध्ये यामध्ये आणखी वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात जवळपास २८ टक्के वाढ झाली आहे.
अधिक माहितीसाठी - गाढ झोपेत असताना आला मोठा आवाज, घराबाहेर धाव घेताच दिसलं थरारक दृश्य
ऑगस्ट महिन्यात सोने आणि चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. फक्त भारतातच नाही तर जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत २३ टक्क्यांनी वाढ झाली होती. याआधी २०१९ मध्येही सोन्याचे दर दहा टक्क्यांहून अधिक वाढले होते. सोन्याच्या दरात वाढ होण्याचे कारण कोरोना व्हायरस असल्याचे म्हटले जात आहे.
चांदीचे भाव