esakal | सहा हजारांच्या घसरणीनंतर, सोन्याच्या दरांत किंचित वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

silver and gold

आतापर्यंतचा सोने बाजाराचा इतिहास पाहिला तर, जागतिक संकटांच्या वेळेस सोन्याचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले होते.

सहा हजारांच्या घसरणीनंतर, सोन्याच्या दरांत किंचित वाढ

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: गेल्या सत्रात सोन्याचे भाव (Gold prices ) चांगलेच तेजीत होते. मागील सत्रात नफा मिळवल्यानंतर भारतीय बाजारपेठेत आजचे सोन्याचे भाव सौम्य प्रमाणात वाढले आहेत. एमसीएक्सवर ( MCX) सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी वाढून 50 हजार 190 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचे वायदे बाजारातील दर 0.5 टक्क्यांनी वाढून 60 हजार 773 प्रति किलो झाले आहे. मागील सत्रात सोन्याचे भाव १ टक्क्यांनी वाढले होते. तर चांदीचे दर २.३ टक्क्यांनी वाढले होते. 

देशात कोरोनाकाळात सोन्याचे भाव आतापर्यंतच्यावर उच्चांकावर गेल्याचे दिसले होते. 7 ऑगस्टला सोन्याचे दर उच्चांकी वाढून प्रति 10 ग्रॅमला 56 हजार 200 पर्यंत गेले होते. जागतिक अर्थव्यवस्थेतील आव्हाने पाहता सोन्याला खालच्या पातळीवर आधार मिळण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. आतापर्यंतचा सोने बाजाराचा इतिहास पाहिला तर, जागतिक संकटांच्या वेळेस सोन्याचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले होते.

वाचा सविस्तर- चीनसह पूर्व आशियातील देशांच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा संसर्ग

जागतिक बाजारपेठेतही सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. डॉलरच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमती उतरल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं आहे. सध्या गुंतवणूकदारही सोन्यापेक्षा अमेरिकन डॉलरमध्येच गुंतवणूक करत असल्याचे दिसत आहे. 

जागतिक बाजारपेठेत (global markets) स्पॉट सोन्याच्या दरात 0.15 टक्क्यांची वाढ होऊन सोने 1,883.69 डॉलर प्रति औंस झाले आहे. जागतिक सोने बाजारातील सोन्याच्या दरावर अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीचा मोठा परिणाम दिसत आहे. 3 नोव्हेंबरला होणाऱ्या अमेरिकेतील  सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि माजी उपाध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) आपल्या पहिल्या अध्यक्षीय चर्चेत भाग घेतील.

 देशात 1 ऑक्टोबरपासून नवे नियम; बेकरी पदार्थ,वाहतूक नियम ते विमा पॉलिसीत होणार बदल

मागील सत्रात कमालीची घसरण नोंदवल्यानंतर प्रतिस्पर्ध्यी चलनांच्या तुलनेत डॉलर निर्देशांक 0.04 टक्क्यांनी घसरला होता. कमकुवत डॉलरमुळे इतर चलनधारकांसाठी सोने काही प्रमाणात स्वस्त झाले होते.