
सोने चांदीच्या किंमती कमी होऊन पुन्हा हळू हळू वाढत असल्याचं दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारातही सोने चांदीच्या दरात किरकोळ वाढ बघायला मिळाली.
नवी दिल्ली - सोने चांदीच्या किंमती कमी होऊन पुन्हा हळू हळू वाढत असल्याचं दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारातही सोने चांदीच्या दरात किरकोळ वाढ बघायला मिळाली. दिल्लीच्या सराफ बाजारात सोमवारी सोन्याचे दर 94 रुपये प्रति दहा ग्रॅमला वाढले. तर चांदी 340 रुपये प्रति किलो इतकी वाढली.
त्याआधी दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 46 हजार 783 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके होते. तर चांदी 68 हजार 51 रुपये प्रति किलो इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली.
दिल्लीत सोन्याच्या दरात वाढ झाल्यानं सोमवारी प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 46 हजार 877 रुपये इतके झाले. याआधी सोन्याचा दर 46 हजार 783 रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सोने 1815 डॉलर प्रति औंस इतके झाले.
हे वाचा - मोठी बातमी : शेअर बाजाराचा आणखी एक उच्चांक
सोन्यासह चांदीच्या दरातही किरकोळ वाढ झाली आहे. सोमवारी दिल्लीच्या सराफ बाजारात चांदीचे दर 340 रुपयांनी वाढले. यामुळे एक किलो चांदीचा दर 68 हजार 391 रुपये इतका झाला. आंतरराष्ट्रीय बाजारत चांदीचा दर 27.16 डॉलर प्रति औंस झाला आहे.
अमेरिकेत पेरोल डेटा आणि प्रोत्साहन पॅकेजवरून लोकांच्या आशा आणि अपेक्षांना धक्का बसला आहे. यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेत नोकऱ्यांबाबत ज्या अपेक्षा होत्या त्याला धक्का बसला आणि डॉलरवर दबावामुळे सोन्याचे दर वाढत आहेत असंही मत व्यक्त केलं जात आहे.
आणखी वाचा - एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी होऊ शकते बंद; वाचा कारण
6 महिन्यात 9 हजारांनी सोनं स्वस्त
गेल्या वर्षभरात सोन्याचा दर बराच कमी जास्त झाला आहे. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. जवळपास 56 हजार 200 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका दर ऑगस्ट महिन्यात झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या दरात 9 हजार 300 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही तेवढीच घसरण बघायला मिळाली. ऑगस्ट महिन्यात एक किलो चांदीचा दर 77 हजार 840 रुपये इतका होता. आतापर्यंत चांदी 9 हजार 400 रुपयांनी स्वस्त झाली आहे.