Gold Price - सलग चौथ्या दिवशी सोने-चांदी स्वस्त

टीम ई सकाळ
Thursday, 4 February 2021

अर्थसंकल्पात सोन्यावर असलेले आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केल्यानंतर सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली. चांदीचे दरही गेल्या चार दिवसात कमी झाल्याचं दिसत आहे.

नवी दिल्ली - अर्थसंकल्पात सोन्यावर असलेले आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केल्यानंतर सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली. चांदीचे दरही गेल्या चार दिवसात कमी झाल्याचं दिसत आहे. भारतीय सराफ बाजारात सोन्याचे दर पुन्हा कमी झाले असून दिल्ली गुरुवारी सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमला 322 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दर किलोमागे 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. 

दिल्ली सराफ बाजारात गुरुवारी सोन्याचा दर 47 हजार 457 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. तर चांदी 68 हजार 142 रुपये एक किलो असा होता. आंतरराष्ट्रीय बाजाराच सोन्याचे दर कमी झाले तर चांदीचा भाव मात्र स्थिर होता.

गुरुवारी सोन्याची किंमत 322 रुपयांनी कमी झाली. त्यामुळे 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर 47.137 रुपये दहा ग्रॅम इतका झाला. याआधी सोने 47 हजार 457 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा दर कमी होऊन तो 1825 डॉलर प्रति औंस इतका झाला. 

हे वाचा - बजेटनंतर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या

सोन्याच्या दरासह चांदीचे दरही उतरले आहेत. चांदी गुरुवारी 972 रुपयांनी स्वस्त झाल्यानं प्रति किलोग्रॅमचा दर 67 हजार 170 रुपये इतका झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर मात्र स्थिर राहिले. 

डॉलरच्या तुलनेत रुपया 6 पैशांनी वधारला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 72 रुपये 90 पैसे इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी झाल्यानं आणि रुपया वधारल्यामुळे भारतीय सराफ बाजारात सोने-चांदीचे दर कमी झाले आहेत. तर दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात सोन्यावरची आयात शुल्क कपातीची घोषणा केली होती. 

हे वाचा - Share Market: दिवसाच्या सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये तेजी; सेन्सेक्स ५० हजारांच्या पुढे

अर्थसंकल्पाच्या दिवशी सोनं जवळपास 1324 रुपयांनी स्वस्त झालं होतं. त्यामुळे सोन्याचा दर 47 हजार 500 रुपयांपर्यंत पोहोचला होता. तर चांदीमध्ये वळपास 3 हजार 461 रुपयांची वाढ बघायला मिळाली होती. 2020 मध्ये सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. जवळपास 28 टक्के सोन्याचे दर वाढले होते. जागतिक बाजारातही सोन्याचा दर जवळपास 28 टक्के वाढला होता. त्याआधी 2019 मध्ये सोन्याचा दरात इतकीच वाढ झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold price silver rates thursday 04 feb kno rates