
सोने चांदीच्या आंतरराष्ट्रीय बाजारीतील किंमतीत वाढ झाल्यानं भारतीय बाजारात दोन्हींच्या किंमती वाढल्या. दरम्यान, कोरोना व्हॅक्सिनबाबत सकारात्मक बाबी घडत असल्यानंही सोन्याची दरवाढ थांबली आहे.
नवी दिल्ली - गेल्या चार दिवसांपासून सोन्याचे दर स्वस्त होत असताना मंगळवारी मात्र वाढ बघायला मिळाली. दिल्लीतील सरफा बाजारात 15 डिसेंबरला सोन्याचे दर 514 रुपयांनी वाढले. तर चांदीही एक हजार रुपयांनी वधारली. एक किलो चांदीच्या दरात 1 हजार 46 रुपयांची वाढ झाली आहे.
सोमवारी सोन्याचा दर 48 हजार 333 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. तर चांदी 62 हजार 566 रुपये प्रति किलो इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीमुळे आणि रुपयाची घसरण झाल्यानं भारतात सोने आणि चांदीचे दर वाढले.
दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 10 रुपयांनी वाढल्यानंतर 48 हजार 874 रुपयांवर पोहोचले. त्याआधी सोमवारी सोने 48 हजार 333 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढून 1845 डॉलर प्रति औंस इतका राहिला आहे.
हे वाचा - गोल्ड म्युच्युअल फंडातील सुवर्णसंधी
चांदीच्या दरातही मंगळवारी वाढ झाली. दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याची किंमत 1046 रुपयांनी वधारल्यानंतर दर 63 हजार 612 रुपये प्रति किलो इतका झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 23.16 डॉलर प्रति औंस इतका झाला.
डॉलरच्या तुलने रुपया 8 पैशांनी घसरल्यानं तो 73.63 वर पोहोचला आहे. तर सोने चांदीच्या आंतरराष्ट्रीय बाजारीतील किंमतीत वाढ झाल्यानं भारतीय बाजारात दोन्हींच्या किंमती वाढल्या. दरम्यान, कोरोना व्हॅक्सिनबाबत सकारात्मक बाबी घडत असल्यानंही सोन्याची दरवाढ थांबली आहे.
हे वाचा - Gold Price - सोनं 42 हजारापर्यंत होऊ शकतं स्वस्त
ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर 56 हजार 254 रुपयांवर पोहोचला होता. चांदी 76008 रुपये प्रति किलो इतकी झाली होती. त्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे.