सोन्याच्या दरात एकाच दिवशी एक हजारांची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold prices

सोन्याच्या दरात एकाच दिवशी एक हजारांची वाढ

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती.

बारामती : सोन्याच्या भावाने आज उसळी घेत तब्बल एक हजारांची वाढ नोंदवली. गेल्या काही दिवसात दसरा दिवाळीमुळे पश्चिम महाराष्ट्रात सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी होती, परिणामी मागणी अधिक व पुरवठा कमी झाल्याने आज अचानकच एक हजारांची वाढ सोन्याच्या दरात नोंदवली गेली.

हेही वाचा: T+1 Settlement म्हणजे काय? 25 फेब्रुवारीपासून होणाऱ्या बदलाविषयी जाणून घ्या

आगामी काळात देशभरातील मोठया शहरांमध्ये होणारी प्रदर्शने आणि गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांनी सोने खरेदीमध्ये दाखविलेला कमालीचा रस या मुळे मागणी अधिक झाल्याने पुरवठ्यावरही परिणाम झाला. मध्यंतरी अक्षय़तृतीया व गुढीपाडव्याच्या कालावधीत लॉकडाऊन असल्याने सोने खरेदीचे मुहूर्त हुकले होते. त्याची कसर दसरा दिवाळीत लोकांनी भरुन काढल्याची माहिती इंडियन बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राज्याचे समन्वयक किरण आळंदीकर यांनी दिली.

दुसरीकडे लग्नसराई मुळेही सोन्याच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे. दीड वर्षांपासून लग्नांवरही मर्यादा होत्या, आता त्या काहीशा शिथील झालेल्या असल्याने सोनेखरेदीवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसतो आहे. पुढील काही महिन्यात गुजरात व मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठी प्रदर्शन होणार असल्यानेही सोन्याची मागणी वाढलेली आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये सोनं 50 हजार पार! दिवाळीनंतर दरांची गगनभरारी

या सर्वांचा एकत्रित परिणाम आज भावावंर झाला. काल 24 कॅरेट सोन्याचा दर 48350 रुपये प्रति तोळा होता आज तोच दर 49300 रुपयांपर्यंत गेला. 22 कॅरेटला काल 45700 दर होता तो आज 46700 झाला तर 18 कॅरेट सोन्याचा दर काल 38300 प्रति तोळा होता आज तोच 39200 रुपये इतका झाला.

सोन्याच्या दागिन्यांमधील गुंतवणूक ही फायदेशीर ठरत असल्याचा आजही लोकांचा विश्वास आहे, त्या मुळेही इतर गुंतवणूकीपेक्षाही सोन्याच्या गुंतवणूकीला प्राधान्य दिले जात आहे, त्या मुळेही सोन्याला मागणी वाढली आहे.

loading image
go to top