esakal | Gold Prices: सोन्याच्या किंमतीत वाढ तर चांदी स्थिर; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

gold and silver

मागील आठवड्यात देशात सोने-चांदीच्या घसरणीनंतर आज सोन्याचा भाव वाढला आणि चांदी स्थिर राहिली आहे.

Gold Prices: सोन्याच्या किंमतीत वाढ तर चांदी स्थिर; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: मागील आठवड्यात देशात सोने-चांदीच्या घसरणीनंतर आज सोन्याचा भाव वाढला आणि चांदी स्थिर राहिली आहे. आज एमसीएक्सवर डिसेंबर गोल्ड फ्युचर्सच्या सोन्याचे दर 0.05 टक्क्यांनी वाढून 50 हजार 856 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर चांदीचे दर प्रति किलो 63 हजार 600 रुपयांवर स्थिर राहताना दिसले. मागील सत्रात सोन्याचा भाव सुमारे 0.2 टक्क्यांनी कमी झाला होता. 

तसेच गेल्या आठवड्यात एमसीएक्सवरील सोन्याचे भाव 1200 रुपयांनी घसरले होते. कोविड-19 लसीच्या आशावादामुळे सोन्याच्या किंमतीत सारखा चढउतार होत आहे, असाच ट्रेंड परदेशी बाजारपेठेतही दिसत आहे.

#stockmarket: भारतीय भांडवली बाजारात ऐतिहासिक वाढ

जागतिक बाजारपेठेतील सोन्याचे भाव-
जागतिक बाजारपेठेतील सोन्याचे भाव आज स्थिर होते. अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम होताना दिसत आहे. तसेच अमेरिकन लसनिर्मित्ती कंपनी 'मॉडर्ना'ने त्यांची कोरोनाची लस यशस्वी ठरत असल्याची माहिती दिल्याने जागतिक बाजारपेठेत मोठा बदल दिसला आहे. या कारणांमुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे दर प्रति औंस 1890.43 डॉलर होते.

मॉडर्ना इफेक्ट-
मॉडर्नाच्या लसीच्या निकालानंतर सोमवारी जागतिक बाजारपेठेत सोने 1.3 टक्क्यांनी घसरले होते. दरम्यान, फेडरल रिझर्व्हचे उपाध्यक्ष रिचर्ड क्लॅरिडा यांनी सोमवारी सांगितले की, कोरोना विषाणूंच्या दोन लसींच्या यशस्वी चाचण्यांमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होईल.

गॅस सिलिंडर बुक करताय? तर मग नक्की हे वाचा

भारताकडील सोन्याचा साठा- 
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (World Gold Council) अहवालानुसार भारतात सध्या 653 मेट्रिक टन सोने आहे. यामुळे सर्वाधिक गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image