Gold Price: तीन दिवसात दुसऱ्यांदा स्वस्त झाले सोने; उच्चतम स्तराच्या 7 हजारांनी आले खाली 

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 12 January 2021

जागतिक परिस्थितीतील बदलाच्या संकेतामुळे भारतातील सोने-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

नवी दिल्ली- जागतिक परिस्थितीतील बदलाच्या संकेतामुळे भारतातील सोने-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज एमसीएक्सवर फेब्रुवारीचे सोने 0.03 टक्क्यांनी घटून 49,328 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे, तर चांदी 0.22 टक्क्यांनी घटून 65,414 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. शुक्रवारी झालेल्या घसरणीनंतर मागील सत्रात सोन्याची किंमत 0.7 टक्क्यांनी वाढली आहे. ऑगस्टमध्ये 56,000 रुपयांपर्यंत पोहोचलेले सोने जवळपास 7000 रुपयांनी खाली आले आहे. 

National Youth Day: राष्ट्रीय युवा दिवसाचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या इतिहास

आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्य़ा किंमतीमध्ये वाढ पाहायला मिळाली, पण मजबूत असलेल्या अमेरिकी डॉलरने याला सीमित मर्यादेत ठेवलं. सोने 0.2 टक्क्यांनी वाढून 1,847.96 डॉलर प्रति औंस झालं आहे, तर चांदी 0.8 टक्क्यांनी वाढून 25.11 डॉलर प्रति औंस झालं आहे. अन्य किंमती धातुंमध्ये प्लॅटिनम 2.3 टक्क्यांनी वाढून 1,055 डॉलर झाले आहे आणि पॅलेडियम 0.3 टक्क्यांनी वाढून 2,378 डॉलर झाले आहे. 

2020 मध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. 2019 मध्येही सोन्याचे भाव वाढले होते आणि आता 2021 मध्येही सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजारांच्या आसपास आहे, पण 2021 मध्ये सोन्याला भाव येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार 2021 वर्ष सोन्यासाठी चांगले राहिल. यावर्षी सोन्याची किंमत 63,000 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. 

शिवेंद्रसिंहराजेंसह समर्थकांना न्यायालयात मिळाला दिलासा

सोन्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असल्यास तुम्हाला आता चांगली संधी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सोन्याची किंमत 28 टक्क्यांनी वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीने नवा रिकॉर्ड स्थापित केला होता आणि आपला ऑल टाईम हाय स्तर गाठला होता. भारतामध्येच सोन्याची किंमत वाढतेय असे नाही तर जगभरात सोन्याच्या किंमती वाढत आहेत. यावर्षी जागतिक बाजारात सोने जवळजवळ 23 टक्क्यांनी वाढले. 2019 मध्ये सोन्याची दर वाढ डबल डिजिटमध्ये होती, 2021 मध्येही ती डबल डिजीटलमध्ये आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold rate today Gold Price silver price know latest rate