
दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते.
नवी दिल्ली- दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते. 1984 साली भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला. त्यानंतर 1985 पासून दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जाऊ लागला. स्वामी विकेकानंद याचे जीवन आणि त्यांच्या विचारांमधून तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला होता.
दुसरा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव; PM मोदी राहणार उपस्थित
या दिवशी देशभरातील शाळा आणि कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी योगासनाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. याशिवाय पूजा-पाठ, व्याख्याने आणि विविकानंद यांच्यावरील साहित्य प्रदर्शनासाठी ठेवले जाते.
तरुणांमध्ये लोकप्रिय होते विवेकानंद
स्वामी विवेकांनंद यांचे नाव अशा विद्वानांमध्ये घेतले जाते, ज्यांनी मानवतेची सेवा हाच खरा धर्म मानला होता. संन्यासी स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये बंगालमध्ये झाला होता. स्वामी विवेकानंद आपल्या आवेशपूर्ण आणि तर्कावर आधारित भाषणांमुळे लोकप्रिय झाले. विशेष करुन त्यांची भाषणे आणि विचार तरुणांना भावले.
मानवतेच्या सेवेसाठी विवेकानंदानी 1887 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. या मिशनचे नाव विवेकानंदानी आपले गुरु रामकृष्ण परमहंस याच्या नावावरुन ठेवले होते. भारतीय तरुणांसाठी स्वामी विवेकांनद यांच्यापेक्षा दुसरा मोठा आदर्श नेता क्वचितच असेल. त्यांनी अमेरिकेतील शिकागोमध्ये 1893 मध्ये आयोजित विश्व धर्म महासभेत भारत आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते.
चिकन विक्रेत्यांना आता मास्क अन् ग्लोज बंधनकारक ! पीपीई कीट घालून मृत पक्षांची...
स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय सांगून जातो की, 39 वर्षाचा त्यांचा अल्प जीवनकाळात त्यांनी जे केलं त्यामुळे भविष्यातील पिढ्यांना ते मार्गदर्शन करत राहतील. 25 व्या वर्षी त्यांनी भगवे कपडे धारण करत संन्यास घेतला होता. पायी चालून त्यांनी संपूर्ण भारतभ्रमण केलं होतं. त्यांनी अनेक देशांनाही भेट दिली होती.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरंन्सिगच्या माध्यमातून दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात (National Youth Parliament Festival - NYPF)उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान महोत्सवाचे तीन राष्ट्रीय विजेते देखील आपले विचार मांडणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.