सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

gold.jpg
gold.jpg

Gold rate today on 8 June 2021: सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील सर्व महत्वाच्या शहरात मंगळवारी सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. MCX च्या माहितीनुसार, मंगळवारी बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति तोळा 110 रुपयांनी घसरण झाली आहे. सध्या सोन्याची किंमत प्रति तोळा 49,970 रुपये झाली आहे. मागील चार महिन्यात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली होती. या कालावधीत सोनं आपल्या सर्वोत्तम किंमतीवर पोहचलं होतं. मात्र, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या मागणीमध्ये घट झाल्यामुळे किंमतही कमी झाली आहे.

देशात लॉकडाउन असल्यामुळे सोने खरेदीकडे सर्वांनीच पाठ फिरवली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी ऑफरचा भडीमार केला. मात्र,तरिही ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. मागील काही दिवसांपासून देश पुन्हा अनलॉक होतोय, त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सोन्यावर आकर्षक सूटही देण्यात येत आहेत. पाहूयात महत्वाच्या शहरातील सोन्याच्या किंमती....

gold.jpg
सोनं खरेदीची मोठी संधी, नऊ महिन्यातील सर्वाधिक सूट

बेंगळुरुमध्ये 22 कॅरेटच्या सोन्याची किंमती प्रति तोळा 110 रुपयांनी घसरून 45,800 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेटच्या सोन्याची किंमत 49,970 रुपये झाली आहे. हैदराबादमध्ये सोन्याची किंमत 110 रुपयांनी घसरून 45,800 रुपये झाली आहे. दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई येथे प्रतितोळा 24 कॅरेटच्या सोन्याची किंमत 110 रुपयांनी घसरुन 49,970 रुपये झाली आहे.

gold.jpg
WhatsAppवर असं करा 'Secret Chat', मेसेज होतील ऑटोमेटिक डिलीट

केरळमध्ये 22 कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रिततोळा 45 हजार 800 तर 24 कॅरेटच्या सोन्याची किंमत 49 हजार 970 झाली आहे. विशाकापट्टणम येथे 22 कॅरेटच्या सोन्याची किंमत 110 रुपयांनी घसरुन 45,800 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 49,970 रुपये झाली आहे.

gold.jpg
मोठा दिलासा... रुग्णसंख्या 90 हजारांच्या खाली

चांदीच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. विशाखापट्टणम आणि हैदराबादमध्ये चांदीची किंमत प्रति किलो 500 रुपयांनी घसरुन 75,800 रुपये झाली आहे. तर बेंगळुरु आणि केरळामध्ये चांदीची किंमत प्रति किलो 600 रुपयांनी घसरुन 71 हजार रुपये झाली आहे.

gold.jpg
कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला, लागण झाल्यास गंभीर धोका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com