सोन्याच्या भावात घट, चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर

उत्पादन शुल्क, मेकिंग शुल्क आणि राज्य कर यामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात.
today gold and silver rate increases
today gold and silver rate increasesesakal
Summary

उत्पादन शुल्क, मेकिंग शुल्क आणि राज्य कर यामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात.

सराफ बाजारात मागील काही दिवसांमध्ये सोन्याची किंमत 47,070 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होती. पण आज तीच किंमत 46,500 रुपये झाली आहे. गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार चांदी 64,400 रुपयांनी प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, मेकिंग शुल्क आणि राज्य कर यामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात.

काय आहे आजचा भाव...

गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 46,500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 47,500 रुपये आहे. त्यात 24 कॅरेट सोन्याचा दर कमी झालेला पाहावयास मिळत आहे. तसेच पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 45,620 रुपये तर 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 48,860 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 46,500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 47,500 रुपये आहे. आज चांदीच्या किंमती प्रति 10 ग्रॅम दर 644 रुपये आहे. काल आणि आजच्या चांदीच्या किंमतीमध्ये दोन रुपयांचा फरक दिसून येत आहे.

today gold and silver rate increases
सोन्याच्या दागिन्यांच्या टंचाईचे संकेत, मुहूर्तावर कसे मिळणार दागिने?
 gold and silver
gold and silver

कशी ओळखाल सोन्याची शुद्धता...

सोने म्हणले तर 24 कॅरेटचेच. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुध्द असते. परंतु 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवणे शक्य नाहीयेय. जास्तीतजास्त करुन 22 कॅरेट सोन्याचा वापर हा वेगवेगळे दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यात 91.66 टक्के सोने असते. तुम्ही सोने खरेदी करताना जर 22 कॅरेटचे सोने खरेदी करणार असाल तर, तुम्हाला एक गोष्ट माहित असायलाच हवी जे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये दोन कॅरेट इतर धातू मिसळलेले असतात. तसेच दागिन्यांमध्ये पाच प्रकारचे शुध्दतेशी संबंधित हॉलमार्क आहे. हेच हॉलमार्क दागिन्यांवर असतात.

gold silver rate
gold silver rate

भारतामध्ये हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर असा ठरवला जातो...

सामान्य सोन्याच्या किंमती आणि हॉलमार्क केलेले सोन्याच्या दरात कोणताही फरक झालेला नाहीयेय. हॉलमार्क सोन्याकरिता अतिरिक्त शुल्क घेतला जात नाही. नेहमी सामान्य सोने ज्या किंमतीने विक्री केली जाते त्याच किंमतीने हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या किंमती असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com