esakal | सोन्यासह चांदीचे दर वाढले; जाणून घ्या आज काय आहेत भाव
sakal

बोलून बातमी शोधा

gold rates

गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात बरेच चढ उतार झाले आहेत. 7 ऑगस्टला सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर दर कमी जास्त होत असून आता पुन्हा हळू हळू वाढ होत आहे.

सोन्यासह चांदीचे दर वाढले; जाणून घ्या आज काय आहेत भाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात बरेच चढ उतार झाले आहेत. 7 ऑगस्टला सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर दर कमी जास्त होत असून आता पुन्हा हळू हळू वाढ होत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, सोमवारी दिल्ली सराफा बाजारात  सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 161 रुपयांनी वाढून 52,638 रुपये झाले आहेत. चांदीचा दराबद्दल पाहिलं तर चांदीच्या दरातही वाढ दिसून आली आहे. चांदीचे  दर 800 रुपयांनी वाढून 68,095 रुपये प्रति किलो झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1960 डॉलर्सपर्यंत पोहोचली तर चांदी प्रति औंस 27.8  डॉलरवर आहे. या संदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, "अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 161 रुपयांनी वाढल्या आहेत."  देशांतर्गत शेअर बाजारात घसरण आणि अमेरिकन चलनाची मजबुती यामुळे रुपयाचा प्रारंभिक नफा सोमवारी कमी होऊन 21 पैशांनी तोटा झाला आहे. तो डॉलरच्या तुलनेत 73.60 रुपयांवर बंद झाला.

सोन्याच्या किंमतींनी 7 ऑगस्ट रोजी भारतीय स्थानिक बाजारात प्रति दहा ग्रॅम 56200 रुपयांच्या उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या किंमती सतत खाली येत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अमेरिकन डॉलर मजबुत होऊ लागल्याने सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

हे वाचा - प्राप्तिकर विवरणपत्र कोणाला बंधनकारक?

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारासोबत भारतात सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता दिसून येत आहे. कोरोना महामारीच्या काळात सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली होती. आतापर्यंतचा सोन्याच्या दरवाढीचा इतिहास पाहिला तर, सोने नेहमी जागतिक संकटाच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वधारले होते.  

काल नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 50 हजार रुपयांवर, तर चेन्नईमध्ये 49,120 रुपयांवर गेले आहेत. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मुंबईत हा दर 50 हजार 450 रुपये होता. तसेच चेन्नईत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 53,580 रुपये होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि घडवनीच्या शुल्कामुळे सोन्याचे दर दररोज बदलत असतात. सोने या धातूचा किमंतीबाबत दुसरा क्रमांक लागतो.