Gold Price : सोने खरेदी करणं झालं महाग! पाहा किती आहे 10 ग्रॅमची किंमत

सोन्याच्या वाढत्या किंमतींनी सामान्यांना अडचणीत टाकलंय.
Check Today's Gold Silver Price Updates
Check Today's Gold Silver Price Updatesesakal
Summary

सोन्याच्या वाढत्या किंमतींनी सामान्यांना अडचणीत टाकलंय.

रशिया आणि युक्रेनच्या संकटाचा (Russia Ukraine Crisis) परिणाम भारतासह जगभरातील सराफ बाजारावर दिसून येत आहे. त्याचा परिणाम भारतीय सराफ बाजारावरही दिसून येतोय. भारतात सोन्याचा भाव (Gold Silver Price) पुन्हा एकदा 50 हजार रुपयांच्या पुढे गेला असून चांदीने 64 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. सोन्याच्या वाढत्या किंमतींनी सामान्यांना अडचणीत टाकलंय. ज्या लोकांना आपल्या मुलांच्या लग्नासाठी किंवा इतर दुसऱ्या कारणासाठी सोनं घ्यायचं आहे त्यांनी लगेच निर्णय घ्यायची गरज आहे. (Today's Gold Silver Price Updates)

Check Today's Gold Silver Price Updates
सोने-चांदीच्या किमतीत किरकोळ वाढ! जाणून घ्या नवे दर

या व्यापारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोने तसेच चांदीच्या भावात किंचित वाढ नोंदवण्यात आली. मंगळवारी सोने प्रति दहा ग्रॅममागे 42 रुपयांनी वधारून 5013 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाले. याआधी सोमवारी सोने 50,089 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदीचा भाव 711 रुपयांनी महागला आणि 64,372 रुपये प्रति किलोवर बंद झाला. याआधी सोमवारी चांदी 63,661 प्रति किलोच्या पातळीवर बंद झाली होती.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवा भाव

मंगळवारी 24 कॅरेट सोने 42 रुपयांनी महागून 50131 रुपये झालेय, 23 कॅरेट सोने 42 रुपयांनी महागून 49 हजार 930 रुपये झाले, 22 कॅरेट सोने 38 रुपयांनी महागून 45 हजार 920 रुपये झाले, 31 कॅरेट सोने 25 रुपयांनी महागून 37 हजार 598 रुपये आणि 14 कॅरेट सोने 68 रुपयांनी महाग होऊन 29 हजार 327 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.

Check Today's Gold Silver Price Updates
सोने-चांदीचे नवे दर जारी! एक तोळे सोन्याची किंमत जाणून घ्या?

अशा प्रकारे जाणून घ्या सोन्याची शुद्धता

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे सोन्याची नवीन किंमत (Latest price of gold) जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर (Retail rates) जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासह, वारंवार अपडेट्सबद्दल माहितीसाठी तुम्ही www.Ibja.Coला भेट देऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com