सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय! जाणून घ्या आजची किंमत

सोन्या-चांदीची आजची किंमत (Gold Silver Rate Today) जाणून घेऊयात.
today gold and silver rate increases
today gold and silver rate increasesesakal

जर तुम्ही आज सोने (Gold)आणि चांदी (Silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल चला तर मग सोन्या-चांदीची आजची किंमत (Gold Silver Rate Today) जाणून घेऊयात. राजधानी भोपाळमध्ये आज सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे. आज भोपाळमध्ये 22 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅमचा भाव 4,687 रुपये आहे, तर कालही त्याची किंमत 4,647 रुपये होती. म्हणजेच 40 रुपयांनी भाव वाढला आहे. बँक बाजार वेबसाइटच्या हवाल्याने ही आकडेवारी समोर आली आहे.

today gold and silver rate increases
सोन्याचे दर किचिंत वाढले, चांदीच्या दरातही वाढ
Gold Silver Rate Today
Gold Silver Rate Today

आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव (The price of gold)

भोपाळ (Bhopal)सराफ बाजारात आज 18 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीतही बदल झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचा 8 ग्रॅमचा भाव आज 37,496 रुपये आहे, तर काल तो 37,176 रुपये होता, म्हणजेच 320 रुपयांनी वाढला आहे. दुसरीकडे, 22 कॅरेट सोन्याच्या 24 ग्रॅमच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तो 39,368 रुपये आहे, तर काल तो 39,032 रुपये होता. म्हणजेच 22 कॅरेट सोन्याचा भाव 336 रुपयांनी कमी झाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅमचा भाव 4,921 रुपये आहे, तर काल तो 4,879 रुपये होता. म्हणजेच 42 रुपयांनी भाव खाली आले आहेत.

चांदीची किंमत (The price of silver)

आज एक ग्रॅम चांदीची किंमत 65.9 रुपये आहे, जी काल 65.1 रुपये होती, अशा प्रकारे चांदीच्या किंमतीत 0.8 रुपयांचा फरक आहे. अशा प्रकारे, एक किलो चांदीच्या पट्टीची किंमत आज 65,900 रुपये आहे, जी काल 65,100 रुपये होती. अशाप्रकारे एक किलो चांदीच्या दरात 800 रुपयांची घट झाली आहे. या सर्व किमती आजपासून लागू होतील.

today gold and silver rate increases
सोने-चांदीच्या दरात आजही वाढ; पाहा आजचे दर
Gold silver rate
Gold silver rate

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे

24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध (Pure) आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे (Copper), चांदी (silver), जस्त (Zinc) यांसारख्या 9 टक्के इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने उत्तम असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता (Purity of gold) कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता (Purity of gold)ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क (Hall Mark) दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com