
मागील दोन महिन्यांत सोने 3000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाले आहे. तर ऑगस्ट 2020 च्या विक्रमी दराशी तुलना करता सोन्याच्या भावात 10000 हजारांची घसरण झाली आहे.
नवी दिल्ली- सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. बुधवारनंतर गुरुवारीही बाजार बंद होताना सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मागील दोन महिन्यांत सोने 3000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाले आहे. तर ऑगस्ट 2020 च्या विक्रमी दराशी तुलना करता सोन्याच्या भावात 10000 हजारांची घसरण झाली आहे.
गुरुवारी जागतिक बाजारात विक्रीकडे कल वाढला असताना देशाची राजधानी दिल्लीत सराफा बाजारात सोन्याचे दर 358 रुपयांनी कमी होऊन 45959 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील सत्रात सोने 46313 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
हेही वाचा- सामान्यांना मोठा झटका! गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढले, 3 महिन्यांत 200 रुपयांनी महाग
दुसरीकडे चांदीच्या दरात 151 रुपयांची तेजी दिसून आली. चांदीचा दर 69159 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला. आदल्या दिवशी 69008 या किंमतीवर बाजार बंद झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे तज्ज्ञ (कमोडिटी) तपन पटेल म्हणाले की, जागतिक स्तरावर सोन्याच्या विक्रीनुसार, दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या हजर किंमतीत 358 रुपयांनी घसरण झाली. तर चांदीची किंमत 151 रुपयांच्या तेजीसह 69159 रुपये प्रति किलो झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरणीसह 1792 डॉलर प्रति औंस आणि चांदी किरकोळ घसरणीसह 27.56 डॉलर प्रति औंसवर व्यवहार सुरु होता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडच्या (आयबीजेए) रेटवर नजर टाकल्यास आज सोन्याचे दर अशापद्धतीने आहेत (हे दर 10 ग्रॅमवर विना जीएसटी)
हेही वाचा- 32 चं पेट्रोल 100 रुपयांना मिळतं, जाणून घ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या वाट्याचं गणित
999 (शुद्धता) - 46838
995- 46650
916 - 42904
750 - 35129
585 - 27400
चांदी 999 - 69226